Hot Posts

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !

 अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !





सोलापूरात नुकसानभरपाईला मंजुरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीच नाही


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे होत्याचे नव्हते झालेल्या शेतकऱ्याला धीर देण्यासाठी आणि नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात येऊन गेले.

या पथकाला येऊन एक महिना उलटला तरी केंद्राला काय अहवाल दिला आणि त्या दौऱ्याचे फलित काय, हा विषय अजूनही अनुत्तरित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आलेला दौरा हा केवळ त्यांना शांत करण्यासाठी होता काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

केंद्रीय पथकात कोण होते?

सदरील पथकाचे नेतृत्व केंद्रीय गृह मंत्रालयाचे सहसचिव आर. के. पांडेय यांनी केले होते. अतिवृष्टीग्रस्तांना एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार मदत दिली जाते. केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर केंद्र सरकार मदतीची ही रक्कम राज्य सरकारला देईल.

अहवालाची प्रतीक्षा

जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर पंचनामे करून अहवाल राज्य सरकारला सादर केला. राज्य सरकारनेही सर्व निकष बाजूला ठेवत मदत जाहीर केली. त्यानंतर केंद्राने मराठवाड्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी हे पथक पाठवले.

पथकातील सदस्यांनी भेटी दिल्यावर लवकरच अहवाल सादर करणार असल्याचे सांगत काढता पाय घेतला.
हा दौरा केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी होता, असा आरोप विरोधकांकडून केला जात होता.
दरम्यान, राज्यात सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात झाले असल्याने, केंद्रीय पाहणी पथकाचा अहवाल केंद्राकडे सादर झाला की नाही, याबद्दल एक महिना उलटूनही स्पष्टता नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सोलापूरात नुकसानभरपाईला मंजुरी पण शेतकऱ्यांच्या खात्यावर काहीच नाही

अतिवृष्टीची १४०० शेतकऱ्यांची दोन कोटी, तर बियाणांसाठीची साडेबारा हजार शेतकऱ्यांची साडेपंधरा कोटी, असे एकूण २५ हजार ८१२ शेतकऱ्यांच्या खात्यावर १७ कोटी ७० लाख रुपये जमा झाले नाहीत.

दरम्यान, खरडून जमीन वाहून गेलेल्या ९५२ शेतकऱ्यांचे १ कोटी ४७ लाख रुपये अद्याप मंजूर झाले नसल्याचे सांगण्यात आले.

यावरून उत्तर तालुक्यातील ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे सव्वीस हजारांहून अधिक खात्यावर १९ कोटी रुपये जमा झाले नाहीत. उत्तर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मे महिन्यापासून नुकसान सुरू झाले.

मे नंतर ऑगस्ट महिन्यात उत्तर तालुक्यातील पाचही मंडळात अतिवृष्टी झाली. यातील काही मंडळांत सप्टेंबर महिन्यातही अतिवृष्टी झाली होती. यामुळे मे महिन्यात उन्हाळी पिकांचे, तर ऑगस्ट महिन्यात खरीप पिकांचे नुकसान झाले होते.

ऑगस्ट महिन्यात झालेल्या पंचनाम्याची नुकसानभरपाई आदेश १२ सप्टेंबर रोजी निघाला. या आदेशाला ८५ दिवस उलटले तरी १, ३८८ शेतकऱ्यांची २ कोटी ७ लाख रुपये रक्कम जमा झाली नाही.

सप्टेंबर महिन्यात झालेला पीक नुकसानभरपाई मंजूर आदेश १८ ऑक्टोबर रोजी निघाला. या आदेशानंतर दोन हेक्टरवरील व तीन हेक्टरपर्यंतचा नुकसानभरपाई आदेश २० ऑक्टोबर रोजी निघाला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments