लातूर कल्याण जनकल्याण महामार्गाचा पेच...सोडवायची जबाबदारी सरकारची ...
कळंब (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृत गती महामार्ग नागपूर ते मुंबईअसा निर्माण झाला... आणि दळणावळणासाठी रस्त्याचे महत्त्व निश्चितपणे मोठे आहे, एखाद्या अविकसित भागाचा विकास होण्यासाठी गतिमान रस्ता असणं अत्यंत आवश्यक आहे अशी भूमिका आता जनतेला आवडू लागली आहे... म्हणून प्रत्येक भागामध्ये रस्त्याचे जाळे निर्माण झालं पाहिजे, आणी गतिमान रस्ते निर्माण झाले पाहिजेत यासाठी समाजामध्ये एक अनुकूलता निर्माण झाली आहे..
महाराष्ट्र शासनाच्या नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लातूर कल्याण जनकल्याण महामार्गाची घोषणा केली....
मुख्यमंत्र्यांनी या रस्त्याची जी घोषणा केली त्याचं स्वागत मराठवाड्यातील जनतेने केलं... निश्चितपणे हा महामार्ग मराठवाड्याच्या उपयोगाचा आणि फायद्याचा बनेल यात कोणालाही शंका नाही.
लातूर कल्याण जनकल्याण महामार्ग सरकारने घोषित केल्याबरोबर... धाराशिव जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील जनतेची हा महामार्ग...अहिल्यानगर पर्यंत कोणत्या मार्गाने घेऊन जायला पाहिजेत याबद्दलची दोन वेगवेगळी मतांतरे आता ठामपणे समोर आलेली आहेत...
बीडकरांचं म्हणणं आहे की लातूर कल्याण जनकल्याण महामार्ग लातूर अंबेजोगाई केज मांजरसुंबा पाटोदा मार्गे अहिल्यानगर पर्यंत न्याहावा.
तर धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या आग्रही मागणीनुसार लातूर कल्याण जनकल्याण महामार्ग.. लातूर तांदूळजा शिराढोण कळंब पारा ईट खर्डा जामखेड आष्टी अहिल्यानगर या मार्गाने तो घेऊन जावा.... असं धाराशिव जिल्ह्यातील जनतेला वाटतं.
दोन्ही जिल्ह्यांमध्ये.. धाराशिवकरांची मागणी ही दोन्हीही जिल्ह्यासाठी सर्वसामावेशक आहे... त्याचं कारण असं की धाराशिव आणि बीड जिल्हा या दोन्ही जिल्ह्याच्या जवळपास सीमेवरून हा रस्ता जाईल ...
त्यामुळे लातूर पासून कळंब पर्यंत हा महामार्ग येत असताना तो तांदूळजा या गावाच्या शिवारातून येईल तांदूळजा या ठिकाणापासून आंबेजोगाई चे अंतर फक्त 24 किलोमीटर आहे... तांदूळजा गावातून पुढे शिराढोण कडे हा रस्ता येत असताना बीड जिल्ह्याची सीमा फक्त आठ ते दहा किलोमीटर अंतरावर राहील..
.
शिराढोण पासून हा रस्ता कळंब ला पोचला तर कळंब पासून बीड जिल्हाआणी केज तालुका हद्द फक्त चार ते पाच किलोमीटरवर आहे आणि केज शहराचे अंतर फक्त पंधरा किलोमीटर आहे...
कळंब वरून हा रस्ता ईटकुर पारा लाखनगाव मार्गे ईट कडे जात असताना बीड जिल्ह्याची हद्द इथेही सात ते दहा किलोमीटर अंतरावर राहते.. पारा ईट कडून खर्ड्याकडे हा रस्ता जात असताना बीड जिल्ह्यातील चौसाळा आणि त्यापुढील गावे या सर्वांना हा रस्ता जोडत पुढे जाऊ शकतो.
हा रस्ता पुढे खर्डा जामखेड मार्गाने पुढे गेला तर पुन्हा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका या रस्त्याच्या लाभामध्ये येतो.. आणि मग बीड जिल्ह्यातून हा महामार्ग पुढे अहिल्यानगर कडे मार्गस्थ होईल.
तेव्हा धाराशिव करांची जी मागणी आहे ती जर सरकारने विचारात घेतली.. तर लातूर जिल्ह्याबरोबरच बीड जिल्हा, आणी धाराशिव जिल्हा या दोन्ही जिल्ह्याला या रस्त्याचा समान लाभ. मिळू शकतो..
म्हणजे लातूर पासून हा महामार्ग विचारात घेतल्यावर या महामार्गाच्या एका बाजूला आंबेजोगाई, केज, बीड, आणि आष्टी या बीड जिल्ह्यातील तालुक्यांना निश्चित या रस्त्याचा फायदा होईलच महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला कळंब वाशी भूम हे धाराशिव जिल्ह्यातील असलेल्या तीन तालुक्याला लाभ होईल आणि पुढे जामखेड तालुक्यामध्ये हा महामार्ग मार्गस्थ होईल...
म्हणजे जर धाराशीवकरांची मागणी सरकारने विचारात घेतली तर खऱ्या अर्थाने बीडला सुद्धा म्हणजे बीड जिल्ह्याच्या चार तालुक्यांना थेट लाभ या रस्त्याचा होईल आणि दुसऱ्या बाजूला धाराशिव जिल्ह्यातील तीन तालुके या रस्त्याचे लाभार्थी तालुके बनतील आणि मुख्यता अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड सारखा अत्यंत महत्त्वाचा बाजारपेठेसाठी आणि व्यापारी उलाढालीसाठी उपयुक्त असा तालुका या महामार्गाचा लाभार्थी तालुका होईल...
धाराशिवकरांच्यावतीने आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात ते असे की,
1) लातूर कळंब मार्गाने खर्डा जामखेड अहिल्यानगर असा महामार्ग निर्माण झाल्यास.. रस्ता अगदी सरळ रेषेमध्ये निर्माण होऊन अहिल्या नगर पर्यंत पोहोचेल..
2) या मार्गे जर हा महामार्ग निर्माण झाला तर रस्त्याचे अंतरही कमी होईल...
3) अंतरच मुळात कमी झाले तर रस्त्यावर होणारा खर्चही कमी लागेल
4) अंतर कमी झाले तर निश्चितपणे प्रवासाचा वेळही कमी होईल...
5) बीड जिल्ह्यातील लाभार्थी तालुके संख्या चार आणि धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थी तालुके तीन असा एकूण बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील सात तालुक्यांना या द्रुतगती महामार्गाचा लाभ होईल.
6) अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड सारखा तालुका अंतर्भूत होईल आणी हा महामार्ग आहिल्या नगर वरून आणि माळशेज घाटाच्या दिशेने जाईल.
या सर्व बाबीचा जर विचार केला तर निश्चितपणे लातूर कल्याण जनकल्याण महामार्ग कृती समिती जिल्हा धाराशीव या कृती समितीने केलेली मागणी, धाराशिव जिल्ह्यातील जनतेची अपेक्षा ह्या रास्त आणि योग्य वाटतात ..
कोणताही द्रुतगती महामार्ग...सरकारला जर निर्माण करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता असते... हा असा महामार्ग निर्माण करायचे ठरवल्यास अशा महामार्गाचा जास्तीत जास्त जिल्ह्याला उपयोग झाला पाहिजे अशी निश्चित भूमिका सरकारची असते...आणी असायलाच पाहिजे..
अशा महामार्गाच्याद्वारे महाराष्ट्रातील तमाम जिल्हे मुंबई पुणे सारख्या अत्यंत विकसित शहरांना जोडण्याचा सरकारचा विचार निश्चितच अभिनंदनास पात्र आहे... आणि म्हणूनच लातूर कल्याण जनकल्याण महामार्ग हिवाळी अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जाहीर केला... आणि मराठवाड्यातील जनतेने या निर्णयाचं स्वागत केलं... आता खरा मुद्दा आहे की सरकार हा रस्ता... लातूर बरोबरच बीड आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्याला समान बेनिफिट देत हा रस्ता निर्माण होणार आहे की नाही...
. हा महामार्ग फक्त धाराशिव जिल्ह्याला लाभ देत पुढे गेला पाहिजे अशी आत्मकेंद्री भूमिका धाराशिव जिल्ह्यातील जनतेची नाही... उलट बीड आणि धाराशिव जिल्ह्याला समान लाभ देणारा महामार्ग निर्माण व्हावा... अशीच रास्त भूमिका धाराशिव जिल्ह्यातील जनतेची आहे...
आता खरा प्रश्न आहे की लातूर कल्याण जनकल्याण महामार्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन काय निर्णय घेणार आहे... हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल....
विश्वनाथअण्णा तोडकर, निमंत्रकलातूर कल्याण जनकल्याण दृत गती महामार्ग जिल्हा धाराशिव
अध्यक्ष,
महाराष्ट्र लोक विकास मंच.
छत्रपती संभाजी नगर..

0 Comments