Hot Posts

6/recent/ticker-posts

स्पर्धा परीक्षा विद्यार्थांना न्याय द्यावा-खा.मोहिते पाटील

 स्पर्धा परीक्षा विद्यार्थांना न्याय द्यावा-खा.मोहिते पाटील




अकलूज (कटूसत्य वृत्त):- स्पर्धा परीक्षा विद्यार्थांना न्याय द्यावा अशी मागणी माढा लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
  खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सादर केलेल्या निवेदनात
 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भात वयोमर्यादा सवलत देण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.
तसेच सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी तयारी करणाऱ्या राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना वयोमर्यादेबाबत गंभीर अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
सदर विषयासंदर्भात विद्यार्थ्यांच्या कडून गेल्या ५-६ महिन्यांपासून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असूनही अद्याप कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रमुख समस्या पुढीलप्रमाणे आहेत

1) महाराष्ट्र शासनाने पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादा २८ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवलेली आहे. मात्र, त्याच गृह विभागांतर्गत येणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी केवळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे शासनाने पोलिस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी तात्काळ १ वर्षाची वयोमर्यादा सवलत जाहीर करावी, अशी विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे.

2) संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात प्रसिद्ध होण्यास सुमारे ७ महिन्यांचा विलंब झाला आहे. तसेच वयोमर्यादा गणनेसाठी १ नोव्हेंबर 2025 हा दिनांक निश्चित करण्यात आल्याने, केवळ काही दिवसांच्या फरकामुळे हजारो विद्यार्थ्यांची शेवटची संधी हिरावली जात आहे. त्यामुळे वयोमर्यादा गणनेसाठी १ जानेवारी 2025 हा दिनांक ग्राह्य धरण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

वरील दोन्ही मागण्या या पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असून त्या पूर्णपणे रास्त व न्याय्य आहेत. तरी महाराष्ट्र शासनाने या विषयाकडे सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक तातडीने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments