स्वतःवर विश्वास ठेवून तुमचे धैर्य निश्चित करा- अंबिका बांदल
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- तुमचे भविष्य उज्वल आहे आणि ते घडवण्याची शक्ती तुमच्या हातात आहे. तुम्ही जे काही करता ते मनापासून करा. स्वतःवर विश्वास ठेवून तुमचे धैर्य निश्चित करा आणि कठोर परिश्रमाची तयारी ठेवा असे मत अंबिका बांदल यांनी नातेपुते येथील एस. एन. डी. सीबीएसई स्कूलमध्ये क्रिसमस निमित्त घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. त्या पुढे बोलत असताना म्हणाले की, तुम्ही जे काही करता ते मनापासून करा. चुका होतील पण प्रत्येक चूक तुम्हाला एक नवीन गोष्ट शिकवून जाईल. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा एस. एन. डी. स्कूलच्या शिक्षकांची मेहनत व तुमचे समर्पण तुम्हाला नक्कीच यशस्वी करेल असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षा अंबिका बांदल यांनी व्यक्त केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर रेणुका घोरपडे, श्रुतिका देशमुख, ज्योती पिसाळ देशमुख, दीपिका शिंदे, श्रद्धा देशमुख, मेघा पाटील, स्वप्ना शेटे, रोहिणी पलंगे व्यासपीठावर उपस्थित होत्या उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता नर्सरी ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवरती सांस्कृतिक कार्यक्रम दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी एस. एन. डी. स्कूलचे संस्थापक अध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, चेअरमन मालोजीराजे देशमुख, नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, सेक्रेटरी रोहित शेटे, विश्वजीत पिसाळ, शक्ती पलंगेउपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रायमरी विभागप्रमुख नीलम डोंबाळे यांनी केले. मुख्याध्यापक संदीप पानसरे, उप मुख्याध्यापक शकूर पटेल, पीआरओ मनोज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता.
चौकटीत :
आजचा कार्यक्रम सर्वांसाठी कौतुकाचा आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भावनिक व शारीरिक वाढीमध्ये पालक म्हणून आपण उत्तम भूमिका बजावत आहात. त्याचे उत्तम उदाहरण आज आपल्या सहभागाने या ठिकाणी दिसून आले. प्रत्येक जण आयुष्यात यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो परंतु यश मिळवण्यासाठी परिश्रम मेहनत संयम या गोष्टीची गरज असते.विद्यार्थ्यांनी सकारात्मक रहात सातत्य ठेवून कधीही अपयशांना घाबरू नये
- रेणूका घोरपडे

0 Comments