नुतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा न्यासाच्या वतीने सत्कार
अक्कलकोट (प्रतिनिधी):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट नगरपरिषदेचे नुतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, नुतन नगरसेवक अविनाश मडीखांबे यांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अक्कलकोट नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नुतन नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्यासह श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, नुतन नगरसेवक अविनाश मडीखांबे यांच्यासह सागर कल्याणशेट्टी, प्रथमेश इंगळे, मनोज कल्याणशेट्टी, शिवराज स्वामी यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मनोज निकम, अभिजित लोकापुरे, प्रविण घाटगे, सुमित घाटगे, निखिल पाटील, न्यासाचे पुरोहित सोमनाथ पुजारी, संजय गोंडाळ, वैभव मोरे, विशाल कलबुर्गी, शुभम सावंत, राहूल इंडे, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, राजू पवार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले रमेश हेगडे, विनायक भोसले, धनंजय निंबाळकर, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, रोहित कदम, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

0 Comments