किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचा भाजपात प्रवेश
पालकमंत्री गोरे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा प्रभागाचा तसेच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांची आहे. त्यांचे शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगले नाव आहे ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे. माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २२ मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे याप्रसंगी म्हणाले.
याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता वाघमारे, उमेश जाधव, स्वप्निल शिंदे, कौसेन कुरेशी व माऊली जरग आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.

0 Comments