Hot Posts

6/recent/ticker-posts

नवोदित गायक व निवेदकांचा रविवारी सत्कार; संगीत मैफिलीचे आयोजन

 नवोदित गायक व निवेदकांचा रविवारी सत्कार; संगीत मैफिलीचे आयोजन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज स्टुडिओ सोलापूर प्रस्तुत ऑर्केस्ट्रा धनश्री यांच्या वतीने शहरातील नवोदित गायक व निवेदकांच्या सन्मानासाठी भव्य सत्कार सोहळ्याचे तसेच संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. 26 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अतुल स्वामी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल सुरक्षा अधिकारी जोएल मेकन्झी यांच्या हस्ते होणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याचे अतुल स्वामी यांनी सांगितले.

यावेळी गायक सुहास सदाफुले, सुनिता अय्यर, मेघा साळुंखे, भक्ती महामुनी, सायली साठे, साक्षी देवस्थळी, शशी बासुतकर, निखिल भालेराव आणि विठ्ठल गायकवाड या नऊ नवोदित कलाकारांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. या सत्कारामध्ये स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन कलाकारांचा गौरव करण्यात येईल.

सत्कार सोहळ्यानंतर गीत गायनाची विशेष संगीत मैफल रंगणार असून, विविध लोकप्रिय व सदाबहार गीतांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णतः मोफत असून, सोलापूर शहरातील रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अतुल स्वामी यांनी केले आहे.

या पत्रकार परिषदेस संतोष पवार, अशोक बिराजदार, भागवत जठार, विद्या जठार, धनश्री सरगले यांच्यासह ऑर्केस्ट्रा धनश्रीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments