सोलापूर–अक्कलकोट मार्गावर भव्य वृक्षारोपण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर–अक्कलकोट मार्गावर पर्यावरण संवर्धनासाठी भव्य वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे संकल्पना व नियोजन माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. उपक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कुलकर्णी, अक्कलकोट विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यामावार तसेच नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे अधिकारी मनीभूषण यांच्या हस्ते करण्यात आले.
वळसंग पोलिस ठाण्याचे एपीआय राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी-कर्मचारी, जीआरएमआर पथक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.
सोलापूर ते अक्कलकोट रोडच्या दोन्ही बाजूंना वड, पिंपळ, बोकर, नीम यांसह विविध छायादायी व पर्यावरणपूरक रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यालगत हिरवाई वाढविणे आणि स्वच्छ-सुंदर पर्यावरण निर्मिती हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण उद्देश असून, तो प्रभावीपणे साध्य झाला आहे.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवर, अधिकारी-कर्मचारी व परिसरातील नागरिकांचे मनःपूर्वक आभार– वळसंग पोलिस ठाणे, जि. सोलापूर ग्रामीण
.png)
0 Comments