Hot Posts

6/recent/ticker-posts

ब्रह्मांड संगीत कट्टा वसंत विहार शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न

 ब्रह्मांड संगीत कट्टा वसंत विहार शाखेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न

 ठाणे (कटूसत्य वृत्त):- ब्रह्मांड कट्ट्याचे संस्थापक श्री.राजेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ब्रह्मांड कट्टा वसंत विहार संगीत संस्थेचा  प्रथम वर्धापन दिनाचा सांगितीक सोहळा दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी ब्रह्मांड कट्टा सामाजिक-सांस्कृतिक मंडळाने सांज स्नेह जेष्ठ नागरिक संघ सभागृह येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक राजेश जाधव व ब्रह्मांड कट्ट्याचे अध्यक्ष महेश जोशी, सौ स्नेहल जोशी,सौ. प्रगती जाधव , वसंत बिहार संगीत संस्थेच्या अध्यक्ष ऋजुता देशपांडे व प्रल्हाद माघाडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून व हितेश पिल्लई  यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली.

या सांगितिक सोहळ्यात जुनी व नविन हिंदी ,मराठी गाणी सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनांतर्गत ऋजुता देशपांडे व प्रल्हाद माघाडे यांनी केले होते. गाणी उत्साहपूर्ण व दमदार अशा शैलीतील होती ज्याचा सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून आनंद घेतला. 'देखा है तेरी आखो में प्यार' हे जे. पी जितेंद्र, 'आवारे भवंरे जो होले होले' हे अंजना जोशी यांनी अप्रतिम गाणे सादर केले.आसावरी गोखले यांचे 'जब छाये मेरा जादु' ,वरदा परांजपे यांचे 'छलिया छलिया' तर निती जोशी  व अभिषेक राणे यांचे 'जो हाल दिलका', प्रल्हाद माघाडे व आसावरी गोखले  यांनी सादर केलेले 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यांना भरभरून दाद दिली.  दरम्यान संस्थापक राजेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक-सांस्कृतिक कामाचा आलेख दृक्श्राव्य माध्यमातून दाखविण्यात आला. त्याचप्रमाणे वसंत विहार संगीत संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा एलईडीवर दाखवण्यात आला.  

'आय एम द बेस्ट' या अथर्व जोशी यांनी सादर केलेल्या गाण्यातून राजेश जाधव यांच्या कार्याला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. आशिष चव्हाण यांचे 'देखा ना हाय रे', किर्ती दळवी यांचे 'जवानी जानेमन' ,नीता संक्रानी यांचे 'कोई जाए तो ले आए',सुनिल कोकणे यांचे 'मै निकला गड्डी ले के',अनुराग शर्मा यांचे 'परदा है परदा', हितेश पिल्लई यांचे ' याद आ रहा है', उमेश नामजोशी यांचे ' मै जट यमला पगला' अशी सुरेल व धमाकेदार गाणी सादर झाली.  'दिसला ग बाई दिसला' हे राणी मेजारी व सुधा राजेश यांचे 'दम मारो दम', मंजुषा पोरे यांचे 'एक दो तीन'  या गाण्यांना रसिकांनी टाळ्या व शिट्यांनी दाद दिली. ब्रह्मांड वसंत विहार संगीत संस्थेच्या अध्यक्षा ऋजुता देशपांडे यानी जुली या चित्रपटातील 'माय हार्ट इज बिटींग' हे गाणे अप्रतिम सादर केले. 
कार्यक्रमाच्या मध्यंतरात राजेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून सोहळा साजरा करण्यात आला. उपस्थित असलेल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांनी राजेश जाधव यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
     

संस्थापक राजेश जाधव यांच्या  विविध स्तरावरील कार्याचा आढावा घेण्यात आला. त्या वेळेस भाजप माजी गटनेते मनोहर डुंबरे, शुभकुंदा प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रविण नांगरे, भाजप उपाध्यक्ष अमर घरत इतर अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून  वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. राजेश जाधव यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून   शुभेच्छा  दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
 ऋजुता देशपांडे व हितेश पिल्लई यांच्या कोंबडी पळाली ,प्रल्हाद माघाडे यांच्या झिंगाट चित्रपटातील गाण्यावर रसिकांनी नृत्य करून धमाल केली. 


 ब्रह्मांड वसंत विहार संगीत संस्था यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त  ॠजुता देशपांडे, अध्यक्षा व प्रल्हाद माघाडे,सचिव यांना ब्रह्मांड कट्ट्यातर्फे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सर्व कलाकारांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निवेदका  ऋजुता देशपांडे होत्या. ध्वनी व्यवस्था अनंत नाकती तर व्हिडिओ चित्रीकरण रविंद्र टिळकर यांनी केले. एलइडी व्यवस्थापन मोहम्मद अली यांचे होते.

सप्तरंग सुरांनी नटलेला 'बार बार दिन ये आये' हा जोशपूर्ण वातावरणात सादर झाला. ब्रह्मांड कट्टयाचे अध्यक्ष महेश जोशी यांनी मानलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Reactions

Post a Comment

0 Comments