कामे होत नसल्याचा संताप; मंगळवेढ्यात नागरिकांनी भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यांनाच कोंडले!
मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा येथील भूमि अभिलेख कार्यालयामध्ये ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत कामासाठी ताटकळत ठेवले जात असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज भूमी अभिलेख कार्यालयातील उपस्थित कर्मचाऱ्यांकडून कोंडून ठेवण्याचा प्रकार आज सायंकाळच्या दरम्यान घडला.
या कार्यालया अंतर्गत नोंद असलेल्या अनेक दस्तऐवज मध्ये वारस नोंद करणे, बँक कर्जाचा बोजा चढवणे, नवीन नोंदी प्रमाणित करणे, अज्ञान पालन नाव लावणे,सज्ञान झाल्यावर नाव कमी करणे,हक्कसोडपत्र,बक्षीसपात्रा साठी आवश्यक दस्त उपलब्ध करणे, यासह अन्य कामासाठी 2022 पासून नागरिक हेलपाटे घालत आहेत.
याशिवाय जमीन मोजणीचे काम देखील याच कार्यालयाशी निगडीत आहे मात्र या कार्यालयाकडून या नागरिकांची कामे वेळेत केले जात नाहीत प्रत्येक वेळेला हेलपाटे मारण्यासाठी प्रवर्त केले जात आहेत ज्यांच्याकडून अर्थपूर्ण व्यवहार होतो त्यांच्या नोंदी तत्काळ प्रमाणात केला जातात व त्यांचे कामे तात्काळ निर्गत केले जातात परंतु ग्रामीण भागातून आलेल्या गोरगरीब नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या कार्यालयाकडून होत आहेत यापूर्वी या कार्यालयाबाबत सातत्याने अनेक पक्षानी आंदोलन करून आपल्या कारभारास सुधारणा करण्याबाबतचे निवेदन दिले होते मात्र या कार्यालयाने या पक्ष कार्यकर्त्याच्या मागणीकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करून शहर व तालुक्यातील नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न कायम ठेवला. त्यामुळे आज संतप्त झालेल्या नागरिकांनी चक्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याने शहरात खळबळ उडाली. यावेळी सिदराया माळी, युवराज टेकाळे, समाधान हेंबाडे, रोहिदास कांबळे, बापुसो घोडके, राम मेटकरी, सचिन सरवदे उपस्थित होते.

0 Comments