Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपुरात तहसिलदार/नायब तहसिलदार संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन; महर्षी वाल्मिकी संघाचा पाठींबा,

 पंढरपुरात तहसिलदार/नायब तहसिलदार संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन; महर्षी वाल्मिकी संघाचा पाठींबा,




या बंद मुळे नागरिकांची मोठी गैरसोय होतीय, शासनाने तातडीने तोडगा काढावा - गणेश अंकुशराव 

पंंढरपूर (प्रतिनिधी):  सध्या पंंढरपूर तहसिल कार्यालयात पंढरपुरात तहसिलदार/नायब तहसिलदार संघटनेचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे,  या आंदोलनात महसुल अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. या आंदोलनास  महर्षी वाल्मिकी संघाने पाठींबा दर्शवला असुन  या बंद मुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने शासनाने यावर तातडीने तोडगा काढावा व हे आंदोलन थांबवावे अशी विनंती शासनाकडे  महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केली आहे.

 महसूलमंत्र्यांनी विना चौकशी एक उपजिल्हाधिकारी, चार तहसीलदार, चार मंडलाधिकारी यांचे निलंबन केल्याप्रकरणी राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पश्चिम महाराष्ट्रात बुधवारपासून (ता. १६) बेमुदत कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

निलंबन रद्द करावे या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. निलंबन मागे न घेतल्यास १९ डिसेंबरपासून संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प होणार आहे. 

आज पंढरपुरातील या आंदोलन स्थळी जाऊन महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन आपल्या संघटनेचा पाठींबा जाहीर केला आहे.

या आंदोलनामुळे तहसिल कार्यालयासह सेतू वगैरे सर्व विभागांचे कामकाज ठप्प झाले असल्याने याचा फटका पंंढरपूर शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे विविध कागदपत्रे मिळत नाहीत, शेतकऱ्यांसह पंढरपुरातील नागरिकांना कर्ज किंवा वैद्यकीय मदतीसाठी व इतर कारणांसाठी लागणारे जमिनीचे उतारे मिळत नाहीत तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी ची कागदपत्रे ही मिळत नसल्याने सर्वसामान्य जनता ची सर्व कामे खोळंबली आहेत, तरी शासनाने तातडीने या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करून हे आंदोलन थांबवावे अशी विनंती यावेळी गणेश अंकुशराव यांनी केली आहे. यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments