मनोरमा बँकेच्या दहाव्या शाखेचा वैराग येथे रविवारी होणार शुभारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दहाव्या शाखेचा शुभारंभ वैराग येथे रविवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ११.२० वाजता मातोश्री मंगल कार्यालयात संपन्न होणार आहे. राज्याचे माजी पणन संचालक सुनील पवार यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बँकेचे अध्यक्ष श्रीकांत मोरे भूषविणार आहेत.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सुभाष देशमुख, दिलीप सोपल, आमदार राजन पाटील, राजेंद्र राऊत, दिलीप माने, माजी आमदार, माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ व्ही. व्ही. डोके, विशेष लेखापरीक्षक सतीश पोकळे, वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संतोष सुरवसे, शोभा मोरे, अॅड. सुरेश गायकवाड, अस्मिता गायकवाड, शिल्पा कुलकर्णी यांनी केले आहे.
0 Comments