Hot Posts

6/recent/ticker-posts

दृष्टी परत देणारा सेवायज्ञ

 दृष्टी परत देणारा सेवायज्ञ 

मोफत मोतीबिंदू (फेको) नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या जीवनात नवीन उजेड आणण्यासाठी
श्री सोलापूर गुजराती मित्र मंडळ, रोटरी सोलापूर परिवार आणि शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल
यांच्या संयुक्त विद्यमाने
रविवार, दि. 4 जानेवारी रोजी
मोफत मोतीबिंदू (फेको) नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.ह्याचे उद्घाटन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते होणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून डोळ्यांतील अंधुकता दूर करून जीवनात पुन्हा स्पष्टता व आत्मविश्वास देण्याचा हा एक संवेदनशील व मानवतावादी प्रयत्न आहे. शिबिरामध्ये तपासणीअंती शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या पिवळ्या रेशन कार्डधारक गरजू रुग्णांवर विनामूल्य नेत्र भिंगारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
हे शिबीर गुजरात भवन, सोलापूर येथील वातानुकूलित सभागृहात आयोजित करण्यात आले असून,
गरजू रुग्णांनी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत गुजरात भवन येथे येऊन आपली नावे नोंदवावीत, असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
दृष्टी ही केवळ डोळ्यांची नसून, जीवनाकडे पाहण्याची आशा आहे.
ही आशा पुन्हा जागवण्यासाठी नागरिकांनी या सेवायज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments