ज्ञानेश्वर महाराज प्रगट दिनानिमित्त पारायण व अखंड हरिनाम सप्ताह
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ज्ञानसम्राट श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या प्रगट दिनानिमित्त दि.५ ते १२ डिसेंबर या कालावधीध्ये भव्य ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन विमानतळासमोरील गांगजी पार्क येथे करण्यात आले आहे, अशी माहिती
अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष ह.भ.प. संजय पवार महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज राष्ट्रीय अध्यक्ष भाविक वारकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प. संजय पवार महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. होटगी रोड, जुळे सोलापूर, कुमठे परिसरातील सर्व भजनी मंडळ व भाविक यांच्यावतीने व अखिल भाविक वारकरी मंडळ शहर जिल्हा यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहामध्ये ह.भ.प. मन्मत महाराज बहिरमल, ह.भ.प. पुरषोत्तम महाराज सुतार, ह.भ.प. निळोबा महाराज शिरसट, ह.भ.प. माऊली बचुटे महाराज, ह.भ.प. लक्ष्मन महाराज चव्हाण, ह.भ.प. गोपाळ लोंढे यांची सांयकाळी ५ ते ६ यावेळेत प्रवचने होणार आहेत.
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, ह.भ.प. कृष्णा चवरे महाराज (पंढरपूर), ह.भ.प. प्रकाश साठे महाराज (बीड), ह.भ.प. उमेश दसरथे महाराज (देवाची आळंदी, ह.भ.प. अनिल पाटील महाराज बाभळगावंकर, ह.भ.प. रामराव ढोक महाराज (नागपूर), ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकरदादा बोधले महाराज (पंढरपूर) यांची हरिकिर्तने होणार आहेत. ह. भ. प. नामदेव पवार महाराज (श्रीगोंदा) हे ज्ञानेश्वर महाराज व्यासपीठाचे प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता भव्य दिंडीची नगर प्रदक्षिणा होऊन दुपारी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. गुरुवर्य बापूसाहेब देहूकर महाराज (पंढरपूर) यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद होऊन सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहाचे वैशिष्ट्ये म्हणजे ७५० ज्ञानेश्वरी वाचक पारायणसाठी बसणार आहेत. रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी रेस्पायर क्लिनिक, रामलाल चौक यांच्या वतीने महाआरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, तसेच या शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेस पांडुरंग माने, दीपक हरवाळकर, काशिनाथ सुरवसे, प्रकाश माने, मनोज कासार, अप्पा माने, मधुकर जाधव, बसवराज पनशेट्टी आदी उपस्थित होते.
.png)
0 Comments