Hot Posts

6/recent/ticker-posts

शैक्षणिक उपक्रमांना अन्नछत्र मंडळाचा हातभार

 शैक्षणिक उपक्रमांना अन्नछत्र मंडळाचा हातभार





अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) :- लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट संचलित लायन्स शिशु विकास मंदिर व लायन्स क्लब प्राथमिक शाळेसह क्लबच्या विविध उपक्रमांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले व त्यांच्या कुटुंबियांचे नेहमीच मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याचे प्रतिपादन रिजन चेअरमन अॅड. श्रीनिवास कटकूर यांनी केले.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त तसेच अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा अलकाताई भोसले यांच्या वतीने लायन्स शिशु विकास मंदिर व लायन्स क्लब प्राथमिक शाळेस जलशुद्धीकरण यंत्र देण्यात आले. या जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अॅड. कटकूर यांनी अन्नछत्र मंडळ व भोसले कुटुंबियांचे सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगून लायन्स क्लबच्या उपक्रमांना मिळणारे सहकार्य प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.

यावेळी अमोलराजे भोसले यांनी लायन्स क्लबच्या कार्याचे कौतुक करत भोसले कुटुंबीय व अन्नछत्र परिवार नेहमीच विधायक व समाजोपयोगी उपक्रमांसाठी लायन्स क्लबच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आश्वासन दिले.

याप्रसंगी अलकाताई भोसले, सचिवा अर्पिताराजे भोसले, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, झोन चेअरमन मल्लिकार्जुन मसुती यांच्यासह अक्कलकोट लायन्स क्लबचे अध्यक्ष अभय खोबरे, स्कूल कमिटी चेअरमन राजेंद्र महत्ते, सचिव शिरीष पंडित, खजिनदार विठ्ठलराव तेली, सुभाष गडसिंग, शिवशरण खुबा, प्रभाकर मजगे, प्रकाश यादव, प्रकाश उण्णद, राजशेखर कापसे, सेंट्रल अध्यक्ष स्वामीराव कलशेट्टी, मल्लिनाथ साखरे, शिवपुत्र हळगोदे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीदेवी खुने, शिशु विकास मंदिरच्या मुख्याध्यापिका महानंदा निलगार आदी मान्यवर उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments