Hot Posts

6/recent/ticker-posts

श्रमसंस्कार शिबीरातून स्वयंसेवकाचा व्यक्तिमत्व विकास - सौ.प्रियंकाताई पाटील

 श्रमसंस्कार शिबीरातून स्वयंसेवकाचा व्यक्तिमत्व विकास - सौ.प्रियंकाताई पाटील




अनगर (कटूसत्य वृत्त):- बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,सोलापूर आयोजित मौजे बिटले  येथे विशेष श्रम संस्कार शिबीराचा उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा  सौ. प्रियंकाताई बाळराजे पाटील या होत्या.या प्रसंगी सौ.प्रियंकाताई  पाटील यांनी रा.से.यो.इतिहास सांगून शिबीरातून स्वयंसेवकाचा विकास हे विविध उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.या प्रसंगी  प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी यांनी शिबीरातून गावच्या विविध समस्या सोडविणे गरजेचे आहे असे मार्गदर्शन केले.या प्रसंगी अनगर नगर पंचायतचे मुख्याधिकारी सुरेश भदर, वाचनालयाचे अध्यक्ष शरद सलगर, मोहोळ येथील एस.बी.आय.मॅनेंजर उत्तम भदाडे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.प्रकाश शेटे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.महादेव चव्हाण यांनी केले व आभार प्रा.सागर तळणकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी बिटले गावच्या सरपंच सौ.अर्चना काळे,दाजी काळे,सुनिल सलगर,सौ.माधवी साठे,सौ.रेश्मा थिटे,ग्रामविस्तार अधिकारी गणेश वेदपाठक,ग्रामस्थ,प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments