अशोक कामटे संघटना आयोजित किल्ले स्पर्धांचे पारितोषिक वितरण
सांगोला (कटूसत्य वृत्त):-
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्या वतीने 17 व्या भव्य किल्ले स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संघटनेच्या स्टेशन रोड येथील तोरणा कार्यालयात संपन्न झाला.
सुरुवातीस शहीद अशोक कामटे यांच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात युवा पिढीची आपल्या मातीशी असलेली नाळ जुळून रहावी या उद्देशाने शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने आयोजित किल्ले स्पर्धेत शहर व तालुक्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह 2025, प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
चि.समर्थ प्रशांत काळे, कुंभार गल्ली सांगोला( प्रथम क्रमांक),
चि. स्वयंम प्रशांत गाडे,श्रीराम ग्रुप सांगोला ( द्वितीय क्रमांक),
अष्टविनायक मित्रमंडळ, पुजारवाडी सांगोला ( तृतीय क्रमांक), व उत्तेजनार्थ:–चि. शंभू गोडसे,
शिवशक्ती ग्रुप कुंभार गल्ली सांगोला,
चि. विराज राहुल पाटील, कडलास,
चि. चिन्मय कुलकर्णी. अष्टविनायक ग्रुप, सांगोला ,चि. राजवीर सुधीर वाघ, कुंभार गल्ली सांगोला ,चि.राजवर्धन शिंदे,
चि.अक्षय कुलकर्णी ,
चि. देवराज पोळ– सरंजामदार,
चि. आर्यन ज्योतिराम यादव
या स्पर्धेसाठी अशोक कामटे सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे सर ,मकरंद पाटील ,तेजस कुरकुटे ,रवींद्र कुलकर्णी ,मुकुंद हजारे ,शारीक तांबोळी, मयूर ढोले, विठ्ठलपंत शिंदे सर ,अनिल तारळकर, मंगेश कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले, किल्ले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी न्यू महेश कॉम्प्युटरचे संचालक एन जी शिंदे सर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. यावेळी पालक तसेच शिवप्रेमी ,शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस कुरकुटे व आभार रवींद्र कुलकर्णी यांनी मानले.
चौकट:–
छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळ खऱ्या अर्थाने रयतेसाठी सोनेरी दिवसांचा होता त्याच छत्रपतींचा आदर्श मानून शाहू, फुले ,आंबेडकर या महामानवांनी सामान्यांच्या उत्कर्षासाठी आपले जीवन समर्पित केले शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या दरवर्षी या किल्ला स्पर्धांमधून स्पर्धकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची ओळख होईल व ही लहान मुले सुद्धा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये उज्वल भारताचे एक सुजाण नागरिक म्हणून नक्कीच आपला देश महासत्ता बनवतील यात शंका नाही .
निलकंठ शिंदे सर अध्यक्ष अशोक कामटे संघटना ,सांगोला.

0 Comments