आत्मविश्वास व प्रयत्नांच्या जोरावर ध्येय गाठणे शक्य - महादेव माने
माढा (कटूसत्य वृत्त):- खरंतर मी पुस्तकात व अध्यापनात रमणारा संवेदनशील माणूस परंतु माझे एक स्वप्न होते की, एखादा तरी दूरचा सायकल प्रवास करायचा.यादृष्टीने माझ्याकडे असलेला आत्मविश्वास,सकारात्मक मानसिकता,जिद्द व अथक प्रयत्न व पूर्वीच्या सायकलवीर मित्रांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर मी पंढरपूर ते पंजाब राज्यातील घुमान हे 2700 किलोमीटर लांबीचे सुरुवातीला अशक्यप्राय वाटणारे अंतर सायकलवरून प्रवास करुन सहज पार करु शकलो.विशेष बाब म्हणजे या 25 दिवसांच्या सायकल प्रवासात एकही गोळी किंवा औषधे घेतली नाहीत याचा मला मनस्वी आनंद झाल्याचे प्रतिपादन मोहोळ तालुक्यातील अनगरचे प्राथमिक शिक्षक प्रसिद्ध वक्ते महादेव माने यांनी केले आहे.
ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे ग्रामस्थ व सनराईज मित्रमंडळाच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांच्या सत्काराच्या वेळी बोलत होते.
अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड होते.
प्रास्ताविक जिल्हा सुटा संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ.नेताजी कोकाटे यांनी केले.
पुढे सायकलवीर महादेव माने यांनी सांगितले की,निरोगी आरोग्य सांभाळण्यासाठी कोणतेही वाईट व्यसन करु नये परंतु आज दुर्दैवाने अनेकजण दारू,मावा,गुटखा,तंबाखू, सिगारेट यांच्या आहारी गेले आहेत ही बाब वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिकदृष्ट्या हानीकारक आहे.दररोज योगासने व प्राणायाम करावा. बाहेर हाँटेल व धाब्यावर जाऊन जेवण करण्यापेक्षा घरीच संतुलित,सात्विक व पौष्टिक आहार घ्यावा.नेहमी आनंदी वृत्ती ठेवून सकारात्मक विचार करा.नेहमी चांगली पुस्तके व दर्जेदार साहित्य वाचावे. जीवनात पैसा महत्वाचा आहे परंतु त्याहीपेक्षा विविध छंद व स्वतःचे आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.आज समाजात स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा इतरांवर नाहक व नको ती चर्चा करण्यात वेळ घालविण्याचे प्रमाण वाढले आहे.मी धार्मिक व आध्यात्मिक असल्याने पांडुरंगाचे स्मरण करून दररोज सकाळी सायकल प्रवास करायचो.या प्रवासात माझी पत्नी,मुले,मित्र व नातेवाईक खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे होते त्यांनी मला सातत्याने प्रेरणा दिली. सायकलिंगकडे एक स्पर्धा म्हणून पाहण्यापेक्षा तो एक चांगला छंद व व्यायाम आहे म्हणून करा असे आवाहन करीत भविष्यात या अनुभवावर आधारित एक चांगले पुस्तक लिहिण्याचा मानस असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
-चौकट -
यावेळी अनगरचे प्राथमिक शिक्षक महादेव माने यांनी वयाच्या 57 व्या वर्षी पंढरपूर ते पंजाब राज्यातील घुमान हा 2700 किमीचा सायकल प्रवास केल्याबद्दल, वेताळवाडी हायस्कूलचे शिपाई शंकर चव्हाण यांनी 4200 किमी सायकल प्रवास केल्याबद्दल,विठ्ठलवाडीचे पोलीस कॉन्स्टेबल महावीर बरकडे यांनी पोलिस खात्यांतर्गत सायकल स्पर्धेत क्रमांक पटकाविल्याबद्दल, भारतीय सैन्यदलात गुणवत्तेच्या जोरावर निवड झालेले समरजीत कदम व ओंकार वगरे व बुद्धीबळ स्पर्धेत माढा तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल अरहंत अंकुश डूचाळ यांचा ग्रामस्थ व सनराईज मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी मोहन कदम,आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,चेअरमन अनिलकुमार अनभुले,माजी सरपंच बालाजी गव्हाणे,सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक हनुमंत उबाळे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, लेखक डॉ.संतोष कदम, उपलेखापरीक्षक सुहास शिंगाडे,अशोक गव्हाणे,भिमराव शिंगाडे,अरुण खांडेकर, राजाभाऊ कदम,नेताजी उबाळे,पांडुरंग शिंगाडे,जानुबुवा खांडेकर,सोनाप्पा वाघमोडे, कमलाकर शिंगाडे,नेताजी कदम,लक्ष्मण शिंगाडे,अंकुश डूचाळ,सोमनाथ खरात, प्रा.नितीन कदम,सुशेन भांगे, सतीश गुंड,सज्जन मुळे,धनाजी सस्ते,महादेव कदम,सुधाकर गव्हाणे,अंकुश शिंगाडे,भिवाजी जाधव,कैलास सस्ते,पांडुरंग खांडेकर,शिवाजी कोकाटे, ब्रम्हदेव शिंगाडे,दयानंद शेंडगे,हनुमंत शिंगाडे,अशोक कदम,संतोष शिंगाडे,सत्यवान शिंगाडे,अशोक जाधव,महादेव बरकडे,प्रकाश पारखे,दत्तात्रय काशीद,शिवाजी जाधव यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
सूत्रसंचालन करून सहशिक्षक गोरखनाथ शेगर यांनी आभार मानले.

0 Comments