ग्रंथमित्र कुंडलिक मोरे; ग्रंथालय चळवळीतील समर्पित आयुष्य
वर्धा (कटूसत्य वृत्त):- लोक महाविद्यालय, वर्धा यांचे तर्फे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ग्रंथालय चळवळीसाठी समर्पित आयुष्य म्हणून पुरस्काराने ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांना सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार हे होते. तर उद्घाटक म्हणून मातोश्री डॉ. कमलताई गवई माजी गव्हर्नर ह्या होत्या. डॉ. गोविंद कासट, प्रा. डॉ. महेन्द्र सहारे, प्राचार्य प्रकाश भोयर, डॉ. नारायण निकम संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे सोपानराव पवार, राम मेकले, गुलाबराव पाटील सर्व पदाधिकारी, विनोद गायकवाड, वृषाली हजारे, सारीक माडीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Comments