Hot Posts

6/recent/ticker-posts

आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या फंडातून 14 बोरवेल कामाचे उद्घाटन

 आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या फंडातून 14 बोरवेल कामाचे उद्घाटन





 दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या आमदार फंडातून  एकाच दिवशी 14 बोरवेल यांचे उद्घाटन घेऊन आगळावेळा उपक्रम राबवण्यात आला आहे. 
    वसंतराव नाईक तांडा सुधार समितीचे अध्यक्ष संदीप आण्णा राठोड यांच्या नेतृत्वाखाली मुळेगाव तांडा व परिसरात एकाच दिवशी 14 बोरवेल घेतल्याने पाणीदार आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे गावकऱ्यांकडून आभार व्यक्त होत असून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे. स्वतंत्र काळापासून गावातील पाणी समस्या होती यांचा कायमचे नियोजन केले आहे व तसेच गावातील  पाण्याची नितांत गरज असल्याचे तांडा सुधार समितीचे अध्यक्ष श्री संदीप आण्णा राठोड यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
 मागणीचा विचार करून आमदार कल्याणशेट्टी यांनी मनावर घेऊन त्यांच्या आमदार फंडातून निधी उपलब्ध करून मुळेगाव तांड्यावर पिण्याच्या पाण्याची सोय करून देऊन मुळेगाव तांड्यावरील पाण्याची समस्य निकाली लावला आहे असे मत संदीप आण्णा राठोड यांनी व्यक्त केले आहे
    यावेळी  शिवाजी राठोड नाईक, सागर खांडेकर, अनिल राठोड, डोंगरी राठोड, राजू पवार, सुमित दादा पवार, निरोज पवार, किशोर जाधव, संजय राठोड, सुयश पवार आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments