अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 6, 2025

अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश

अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर शहरात दिवसेंदिवस अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. सत्तेतील महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्व पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा आता तयारीला लागल्याचे पाहायला मिळते. भाजपमधील नाराज असलेल्या नेत्यांवर शिवसेना आपले जाळे टाकत असून अशा नेत्यांच्या हातात धनुष्यबाण दिला जात आहे.

विधानसभा निवडणुकीत पद्मशाली समाजाकडून समाजातील शहर मध्य साठी इच्छुक असलेल्या श्रीनिवास संगा या नेत्याने माघार घेत घेतली होती. आता तोच नेता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत शिवसेनेत गेला आहे. पूर्व भागात संगा यांचे नाव कायमच चर्चेत राहते. त्यामुळे आगामी महापालिकेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून निश्चितच महापालिका लढवण्याचे संकेत दिले आहेत.

याचबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत अशोक चौक भागातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार, आनंद विटकर, व लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केले, याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, युवानेते श्रीनिवास संगा, कामगार सेना जिल्हाप्रमुख सायबन्ना तेगेळी, सचिन जवळकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages