शासकीय धान्य गोदाम परिसरात 21 डिसेंबरला प्रतिबंध आदेश जारी
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्याक्रमानुसार दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रीया शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे पार पाडली जाणार आहेत. सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणूक कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भारतीस नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 06.00 ते मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत प्रतिबंधात्क आदेश जारी केले आहेत.
पंढरपूर नगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततामय व सुरळीतपणे पार पडणेसाठी दि.21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 06.00 ते मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत पंढरपूर येथील कराड नाका ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कॉर्नर, मागील बाजूस मार्केट गेट समोरील रस्त्यावर साबळे ऑटोमोबाईल्स ते शिवशंकर बंगला उजवी बाजू, व्हीआयपी रोड तसेच बेद्रेकर एस टी डी रस्ता ते भीमरस्त्न वार्ताफलक कसबे सदन शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथील परीसरात तसेच गोदामाभोवतीच्या सर्व रस्त्यावर निवडणूक कामाव्यतिरिक्त अनावश्यकपणे थांबणे, वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, खाजगी वाहने थांबवणे या परीसरामध्ये वाद्य वाजवणे, गोंगाट निर्माण करणे, घोषणाबाजी करणे, गर्दी अथवा जमाव करून कामकाजाात अडथळा निर्माण करणे, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाजात अडथळा निर्माण करणे अथवा कामकाजापासून परावृत्त करणेचा प्रयत्न करण्यास यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
सदरचा मार्ग केवळ पादचारी मार्ग म्हणून घोषित करण्यात आला आहे.
0 Comments