Hot Posts

6/recent/ticker-posts

नूरजहाँ शेख यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार जाहीर

 नूरजहाँ शेख यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार जाहीर



अकलूज (कटूसत्य वृत्त):- शैक्षणिक,साहित्यिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशगाव (ता.माळशिरस) येथील नूरजहाँ फकरूद्दिन शेख यांना यंदाचा राष्ट्रीय भारत भूषण आदर्श मुख्याध्यापिका,साहित्यिका व समाजसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे.शिक्षण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच समाज कल्याणासाठी  केलेली निःस्वार्थ सेवा,महिलांचे सशक्तीकरण,आणि पर्यावरण जागृती यासारख्या उपक्रमांद्वारे त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत ही गौरवशाली निवड करण्यात आली आहे.

          शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीवर प्रभावी लेखन करणाऱ्या शिक्षिका ,समाजसेविका आणि साहित्यिका नूरजहाँ शेख यांनी साहित्य लेखन,सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्र या तिन्ही आघाड्यांवर उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्यांची ओळख केवळ शिक्षिके पुरती मर्यादित नाही. त्या एक जागरूक साहित्यिका व समाजसेविका म्हणून परिचित आहे त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे शेतकरी,त्यांच्या लेखणीतून शेतकऱ्याच्या घामाला आवाज मिळतो आणि वाचकांच्या मनात प्रश्न जागे होतात.त्यांची लेखणी समाजमनाला हलवनारी पण विचारांना दिशा देणारी आहे.शिक्षण समाजसेवा आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांचा संगम साधणारी खाऱ्या अर्थाने विचारांची शिक्षिका आणि संवेदनांची लेखिका म्हणून समाजात प्रेरणादायी ठरल्या आहेत. महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतील विविध राज्यातून साडे चार हजार प्रस्ताव दाखल झाले होते.त्यामधून नूरजहाँ शेख यांना पुरस्कारास पात्र ठरविण्यात आले आहे.

            हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा १६ नोव्हेंबर रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे येथे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व बालगंधर्व परिवार ट्रस्टचे अध्यक्ष मेघराज भोसले प्रा.शंकर अदानी,सिने अभिनेत्री मृणाल कुलकर्णी,पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील,सिने अभिनेते युवराज कुमार,कवियत्री वैशाली शेलार यांच्या उपस्थितीत नूरजहाँ शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन हळदे व उपाध्यक्ष विकास उबाळे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments