जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस व सिंहायन या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ्यानिमित सत्कार न्यासाचे वतीने संपन्न झाला. याप्रसंगी माजी खासदार निवेदिताताई माने या उपस्थित होत्या.
दरम्यान न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, पुष्पहार देऊन पत्रमहर्षी, पद्मश्री आदरणीय डॉ.प्रतापसिंह जाधव यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर येथील पोलिस मुख्यालयसमोरील क्रीडांगणावर सदरचा अभिष्ठचिंतन सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी दै.पुढारी सोलापूर आवृत्तीचे निवासी संपादक संजय पाठक, गणेश कुलकर्णी, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, पालखी संयोजक संतोष भोसले, मधुकर सुरवसे, शिवराज स्वामी, सायबन्ना जाधव आदिजण, जनसंपर्क अधिकारी प्रशांत भगरे, महांतेश स्वामी, संतोष माने उपस्थित होते.
.png)
0 Comments