अमोलराजे भोसले यांच्या हस्ते आ. कल्याणशेट्टी यांचा सत्कार
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यासाचे वतीने अभिष्ठचिंतन सोहळा संपन्न झाला.
दरम्यान न्यासाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र, पुष्पहार देऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. सदरचा सत्कार सोहळा हन्नूर रस्त्यावरील कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात संपन्न झाला.
याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे, शिवराज स्वामी, सौरभ मोरे, निखील पाटील प्रवीण घाडगे, गोटू माने, संजय गोंडाळ, अतिश पवार, विशाल कलबुर्गी, राहूल इंडे, यांच्यासह बहुसंख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments