अकलूज नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत सौ.राणीताई खंडागळे
अकलूज (कटूसत्य वृत्त):- मोहिते पाटील यांचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे,संदीप खंडागळे यांची अर्धांगिनी सौ.राणीताई संदीप खंडागळे या अकलूज नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरणार असून, त्या प्रमुख दावेदार म्हणून त्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यातील अकलुज नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद अनुसुचित महिला साठी राखीव झाले आहे. मोहिते-पाटील परिवाने सोलापुर जिल्हाचा विकास करताना नेहमीच गरीब तळागाळातील बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात यावे याकरिता अग्रक्रम दिलेला आहे. मग तो राजकीय, धार्मिक, सामाजिक असो वा रोजगार किंवा व्यवसाय करण्यास दिलेल प्रोत्साहन असेल. मोहिते-पाटील परिवाराने गरीब निष्ठावंत बहुजन समाजाला नेहमीच योग्य संधी दिलेली आहे. यावेळी सुद्धा अकलुज नगरपरिषदेची नगराध्यक्षा पदाची उमेदवारी देताना मोहिते-पाटील परिवारासोबत तीन पिढ्यापासुन कायम एकनिष्ठ सौ. राणीताई संदिप खंडागळे यांना संधी मिळावी अशी जनतेतून मागणी केली जात आहे.
सौ. राणीताई संदिप खंडागळे परिवाराचे पुर्वीपासुनच मोहिते-पाटील कुटुंबाशी ऋणानुबंध आहेत. त्यांचे सासरे कै. शंकर खंडागळे तर पती संदिप खंडागळे यांचे कुटुंब, मोहिते-पाटील कट्टर समर्थक म्हणुन ओळखले जाते. सौ. राणीताई व त्यांचे पती संदिप खंडागळे यांनी अकलुज शहारात मोहिते-पाटील परिवारासमवेत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे, वस्ताद लहुजी साळवे, महात्मा फुले, सावित्रामाई फुले, महंमद पैंगबर, राजमाता अहिल्यादेवी, या महापुरुषांचे जयंतीनिमीत्ताने, गरीब महिलांना साडी वाटप, रक्तदान शिबीर, वाचनालयास पुस्तके दान, जिलेबी खाऊ वाटप, गरिब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, कोरोना काळात मास्क व सॅनिटायजर वाटप, आरोग्य तपासणी शिबीर, संविधान दिन, मुकनायक परिसंवाद कार्यक्रम, दलित पँथर सन्मानाचे आयोजन यासारखे कार्यक्रम तसेच जय मल्हार गणेशोत्सव मंडळ, राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील नवरात्र मंडळ, संत तुकराम महाराज भजनी मंडळ यांचे माध्यमातुन दरवर्षी गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, तुकाराम महाराज बीजेनिमीत्त अभंग गाथा पठन सप्ताह आयोजन, आषाढी वारी दिंडी, वारक-यांचे आदरतिथ्य याबरोबरच शिखर शिंगणापुर कावड यात्रा यासारख्या अनेक कार्यक्रमातुन सौ. राणीताई संदिप खंडागळे व खंडागळे परिवार अकलुज शहारातील नागरिकांबरोबर सदैव सामाजिक बांधिलकी जपत आलेले आहेत ही त्यांची जमेची बाजू ठरू शकते तर त्यांचे पती संदीप खंडागळे यांचाही अकलूज परिसरामध्ये मोठा जनसंपर्क आहे, याचा फायदा सौ. राणीताई खंडागळे यांना होऊ शकतो.
.png)
0 Comments