शिवप्रसाद फाउंडेशनच्या वतीने माळशिरस तालुक्यासाठी आरोग्य शिबिर
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे यांनी शिवप्रसाद फाउंडेशन दहिगाव, श्री सदगुरु शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट, पुणे, तसेच सेवासदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने माळशिरस तालुक्यातील १४ वेगवेगळ्या गावांमध्ये यामध्ये धर्मपूरी, शिंदेवाडी, दहिगांव, फोंडशिरस, मांडवे,लोणंद, कन्हेर, गोरडवाडी, निमगांव, माळशिरस, पिलीव, अकलुज, श्रीपूर, माळीनगर या गावांमधील नागरिकांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर व मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. या महाआरोग्य शिबिरात ९ हजार ५०० रूग्णांनी सहभाग नोंदवून आरोग्याची तपासणी केली होती. यामध्ये वेगवेगळ्या गावांमधील ५ हजार ३०१ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले होते. वरील ठिकाणी घेण्यात आलेल्या सर्व शिबिराचे उद्घाटन शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे तसेच मा.जि.प.सदस्या ऋतुजाताई मोरे व तेथील मान्यवरांच्या हस्ते घेण्यात आले होते.
घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये मोफत हृदयरोग तपासणी( ईसीजी, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी) यूरोलॉजी तपासणी ( लघवीचे आजार, किडनी, मूत्राशयाचे आजार, प्रोस्टेट) डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप( तिरळेपणा, बुबुळ, प्रत्यारोपण, पापणी पडलेले-रेटीना) कॅन्सर तपासणी रक्त तपासणी मेंदूचे आजार तपासणी, शस्त्रक्रिया मनका व मज्जातंतू यासंबंधी मोफत शस्त्रक्रिया अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अव्हॅक्युलर नेक्रोसिस, किडनी स्टोन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारच्या हार्निया शस्त्रक्रिया, आतड्याला पिळ पडणेअन्ननलिकेच्या शस्त्रक्रिया, त्वचा व गुप्तरोग, फिजिओथेरपी, अस्थिरोग आजार व उपचार, मोफत दंत तपासणी व उपचार, मोफत पेसमेकर शस्त्रक्रिया, वॉल रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया, मोफत डिवाईस क्लोजर, लहान बाळाच्या हृदयास छिद्र असणे, माफक दरात शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मधुमेह, उच्चदाब, हिप रिप्लेसमेंट इत्यादी वरील आजारांच्या तपासण्या या शिबिरात घेण्यात आल्या.सेवासदन हॉस्पिटलचे डॉ. लता मोरे व त्यांचे सहकारी यांनी काम पाहिले शिबिराच्या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी, तसेच शिवप्रसाद फाउंडेशनचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकटीत :
माणसाचे जीवन हे सेवेसाठी असावे हा मूलमंत्र मनी धरून जे नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत त्या सर्व नागरिकांना माळशिरस तालुक्यामध्ये शिवप्रसाद फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून त्यांना वैद्यकीय सुविधा मोफत सुविधा दिल्याने दिल्याने मनाला मोठे मानसिक समाधान मिळाले. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बालपणापासून ते तारुण्यापासून ते प्रोढत्वापर्यंत सर्वांचे मानसिक आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाने काही नियम पाळले तर सगळ्या समाजाचे तसेच देशाचे आरोग्य अबाधित राहील.
शरद मोरे
( अध्यक्ष शिवप्रसाद उद्योग समूह, दहिगांव )
फोटो ओळी :
महाआरोग्य मोफत शिबिरात मार्गदर्शन करताना शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद ( बापू ) मोरे

0 Comments