Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी जुन्या शिवसेनेची मशाल झाली प्रज्वलित

 मोहोळ नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी जुन्या शिवसेनेची मशाल झाली प्रज्वलित




एकच नंबर दिपक मेंबर टॅग लाईन धोरणाने शिवसैनिक लागले कामाला

एकूणच नगरपरिषदेच्या उमेदवारीच्या मागणीमध्ये सर्वाधिक मागणी मशालीलाच

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- यापूर्वी नगरपरिषद निवडणुकीसाठी संथ गतीने सुरू असलेल्या हालचालींना आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अत्यंत वेग आला आहे. आता यापूर्वी प्रभागातून इच्छुक असलेल्या अनेकांनी उमेदवारी घेऊन निवडणूक लढवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे सुरू केले आहे. मोहोळ शहरात सध्या चौरंगी लढत होण्याची जवळपास निश्चित झाले आहे. आणि मुख्य लढत होणार आहे ती राष्ट्रवादीतून भाजपामध्ये आलेले राजन पाटील यांच्या समर्थकांची आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिपक गायकवाड यांच्या मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेची. ज्येष्ठ नेते दिपक गायकवाड हे राजकारणातील एक धुरंधर आणि अत्यंत चाणाक्ष निवडणूक रणनीती लावणारे नेते म्हणून संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहेत. वीस वर्षांपूर्वी मोहोळ ग्रामपंचायत मध्ये यशस्वीरित्या सत्तांतर करत त्यावेळी राष्ट्रवादीला पराभूत करत मोहोळ ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा तर फडकवलाच मात्र त्यावेळी सर्वाधिक यशस्वी कारकीर्द पूर्ण करणाऱ्या त्यांच्या भगिनी सीमाताई पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीचा यशस्वीरीत्या अविस्मरणीय शुभारंभ केला.
लोकसभा निवडणुकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराची धुरा सक्षमपणे सांभाळणाऱ्या दिपक मेंबर यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून साठ हजारा पेक्षा जास्तीचा लीड मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला हे संपूर्ण तालुक्याने पाहिले आहे. याशिवाय मोहोळ विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेला अनगर अप्पर कार्यालयाचा मुद्दा देखील सर्वात प्रथम आणि सर्वात शेवटपर्यंत यशस्वीरित्या त्यांनी लावून धरल्यामुळेच राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. विद्यमान आमदार राजू खरे हे जरी दिपक गायकवाड यांचे परिश्रम विसरले असले तरी आ.राजू खरे यांच्या अवतीभोवतीच्या मंडळींना मात्र दिपक गायकवाड यांचा पॉवर मोड काय काय धमाके करू शकतो हे  चांगलेच अवगत आहे.त्यामुळे दिपक गायकवाड यांची क्षमता आणि त्यांची राजकारणातील संयमशीलता मोहोळ शहराला चांगलीच अवगत आहे. त्यामुळे दिपक गायकवाड मोहोळ नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी काय काय रणनीती आखणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

चौकट
पुनश्च एकच नंबर दीपक मेंबर टॅग लाईनला सुरुवात..
 एकच नंबर दीपक मेंबर हे त्यांच्या समर्थकांचे टॅगलाईन धोरण सातत्याने एक नंबर राहण्याला दिपक गायकवाड यांची सायलेंट मोशन पद्धतीने काम करण्याची पद्धतच कारणीभूत आहे. प्रत्येकाला आपलेसे करणारा स्वभाव आणि शेवटपर्यंत पत्ते ओपन न करण्याची रणनीतीच त्यांना राजकारणाच्या यशापर्यंत घेऊन आली आहे हे कोणीही मान्य करते. त्यामुळे या नगरपरिषद निवडणुकीत दीपक गायकवाड कोण कोणते नवे डाव टाकणार आणि निकालानंतर ते यशस्वी झाल्याचे सर्वांना दाखवून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments