मेजर तानाजी माने यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी संपूर्ण प्रभाग एकमुखाने एकवटला
प्रभाग दहा मधील शेकडो समर्थकांनी अनगर येथे जाऊन घेतली ज्येष्ठ नेते राजन पाटील यांची भेट
मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत सध्या सर्वाधिक गाजत असलेल्या प्रभाग क्रमांक दहा मधून खुल्या प्रवर्गातून मेजर तानाजी माने यांनाच उमेदवारी द्यावी या मागणीसाठी प्रभाग क्रमांक दहा मधील अहिल्यानगर, बागवान नगर, विद्या नगर, सुभाष नगर, कुंभार खाणी, बाभूळगाव रोड, गाढवे वस्ती, माने वस्ती आणि अन्य परिसरातील शहरातील आणि वस्त्यांवरील शेकडो समर्थकांनी काल अनगर येथे लोकनेते कारखान्यावर जाऊन भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ मंडळींनी गेल्या अनेक वर्षापासून निष्ठेने पाटील परिवारासोबत असलेल्या आणि भारतीय जनता पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या माने परिवारातील मेजर तानाजी माने यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली.
यावेळी माजी आमदार राजन पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांच्या पक्षनिष्ठेबद्दल आणि मेजर तानाजी माने यांच्याबद्दल असलेल्या प्रभागातील सर्वदूर आपुलकीचे आवर्जून कौतुक करत निश्चितपणे याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन या शेकडो समर्थकांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर हे शिष्टमंडळ आपापल्या परिसरात परतले.
चौकट
मेजर तानाजी माने यांच्या उमेदवारीच्या निश्चितीला आता वेग आला असून या प्रभागातील उमेदवारी निश्चितीसाठी पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांनी पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आवश्यक ते पक्ष संघटनात्मक पाऊल उचलले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश काळे यांच्याकडे कालच मेजर तानाजी माने यांनी रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज सुपूर्द करत या प्रभागातून निवडणूक लढवण्याची इच्छा भारतीय जनता पक्षाकडे केली आहे. मेजर तानाजी माने यांच्या विविध क्षेत्रातील जनसंपर्कामुळे माने यांच्यात उमेदवारीबाबत पक्षस्तरावरून विचार गांभीर्याने सुरू असल्याचे समजते. सद्यस्थितीला या प्रभागातील उमेदवारी मिळवण्यासाठीच्या स्पर्धेत मेजर तानाजी माने आणि त्यांचे समर्थक सर्वात पुढे असून त्यांच्याच उमेदवारीवर कोणत्याही क्षणी शिक्कामोर्तब होऊ शकते असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.
चौकट
बिरूदेव माने, सुनिल कोकणे,राजू माने, गणेश माने, वसंत बरकडे औंदुबर सलगर, नागनाथ वाघमोडे,अंबादास कोकणे, संतोष माने,धुळदेव माने, दिनेश वाघमोडे, नितीन माने, विनोद माने,फंटु माने, आप्पासाहेब खरात श्रीरंग माने,अनिल माने,शरद माने,भारत माने,पंढरी माने, शहाजी माने,अमोल माने, दत्ता खरात, पांडुरंग माने,गणेश वाघमोडे,रवी स्वामी,विजय वाघमोडे, सिताराम लेंगरे, सुभाष माने,महादेव वाघमोडे,दिपक माने,दिलीप माने, दिनेश माने, अभिजीत माने,कुंडलिक माने, अक्षय माने, नागनाथ माने, समाधान माने, कैलास माने, आपासाहेब माने,राहुल माने,सागर माने, चंद्रकांत शंकर माने, अनिल माने, जगन्नाथ माने, प्रमोद माने प्रमोद माने, राहुल शिवाजी माने, सिद्धू सलगर , सागर माने, किसन खरात, दाजी खरात, संजय चव्हाण ,विजय चव्हाण, महादेव वाघमोडे,लक्ष्मण होनमाने,सागर माने, वसंत दूधाळ,दिनेश मोटे,ज्ञानेश्वर होनमाने सुमित ठोंगे,दादा यमगर, गणेश मोटे इत्यादी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

0 Comments