मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध - सीमा पाटील
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा संपन्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- खासदार प्रणिती शिंदे यांच्या शिफारशीने क्रांतीनगर येथे पवार घर ते दाईगडे घर ते माळी घर ते कुंभार घर ते फाळके घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे या कामासाठी ४५ लाख रुपये निधी प्राप्त झाला असून प्रभाग क्रमांक दहा चंद्रलोक पार्क येथे सुमारे ४० लाख रुपयाचा बगीचा विकसित करणे या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच न्यू समर्थ नगर गुलमोहर पार्क येथे बगीच्या विकसित करणे व वॉल कंपाऊंड तयार करणे उद्घाटन सोहळा स्थानिक नागरिकांच्या हस्ते पार पडला. यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी विकास निधी दिल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना सीमा पाटील म्हणाल्या की
येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ नगर परिषदेवर शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकणार आहे.मला पुनश्च कोणत्याही प्रभागातून पक्षाने संधी दिल्यास तुम्हा सर्वांच्या विश्वासाच्या पाठबळावर निश्चितपणे निवडणूक जिंकून विजयश्री खेचून आणू असाही विश्वास यावेळी सीमाताई पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी यावेळी शिवरत्न गायकवाड, संतोष माळी, प्रज्ञा माळी, विजय गायकवाड, रमेश थिटे ,सचिन जानकर, अहमद शेख ,अन्सार शेख ,सद्दाम शेख धनंजय कुंभार,सत्यवान खरात, छाया खरात ,महादेवी स्वामी ,सुवर्णा पवार इत्यादी उपस्थित होते
चौकट
मागील वेळी आपण सर्वांनी प्रचंड मताधिक्याने विजयी केले. मला काम करण्याची दिली प्रभाग १५ सह १४ मध्येही रस्ते लाईट ,पाणी, ड्रेनेज लाईन, नागरी सुविधेसह तसेच अनेक शासकीय व वैयक्तिक योजना या प्रभागासह मोहोळ शहरांमध्ये राबवल्या आत्तापर्यंत सुमारे जुन्या प्रभाग १४ व १५ सध्या नवीन प्रभाग रचनेनुसार झालेल्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये १२ कोटीची कामे केली गेली. आणि यामुळे आपण दिलेल्या संधीचे सोने करून आपण दाखवलेल्या विश्वास सार्थ करून दाखवला आपण दिलेल्या संधीमुळे हे सर्व मी करू शकले त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानते.
सीमाताई पाटील
शिवसेना नगरसेविका

0 Comments