Hot Posts

6/recent/ticker-posts

नाशिक येथील वृक्षतोडीच्या विरोधात वृक्ष संवर्धन समिती बार्शी चे निवेदन

 नाशिक येथील वृक्षतोडीच्या विरोधात वृक्ष संवर्धन समिती बार्शी चे निवेदन




बार्शी (कटूसत्य वृत्त):- नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारी  निमित्ताने तपोवन येथील अठराशे मोठी झाडे तोडली जाणार आहेत. ती झाडे तोडू नये यासाठी वृक्ष संवर्धन समिती बार्शी मार्फत नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ज्या वनात तपश्चर्या साधना केली जाते ते वन म्हणजे तपोवन. हिरवळ आणि शांत वातावरणात असलेल्या या तपोवनात श्रीराम आणि लक्ष्मण यांनी देखील काही काळ घालवला असे बोलले जाते. अशा या तपो वनातील झाडे साधूंच्या तात्पुरत्या राहूट्या/तंबू उभारणी साठी तोडली जाणार आहेत.
खरंतर हे साधू तप करण्यासाठी वनात जातात. पक्षांच्या निसर्गाच्या सानिध्यात तपश्चर्या करतात. ते साधू आता कुंभमेळ्यासाठी येत आहेत आणि येथील वन नष्ट करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे हा खरच विरोधाभास आहे. त्यामुळे प्रशासनाने तेथील झाडे न तोडता पर्यायी मार्ग काढावा व अठराशे मोठ्या झाडांना जीवनदान द्यावे अशी विनंती वृक्ष संवर्धन समिती बार्शीच्या वतीने करण्यात आली आहे.
कारण तंत्रज्ञानाच्या साह्याने कोणतीही सुविधा आपण क्षणात उभी करू शकतो, परंतु झाडे मोठी होण्यासाठी फार काळ जावा लागतो. ती गोष्ट सहज शक्य नाही. ह्या मोठ्या झाडांवर असंख्य पक्षांची घरटी आहेत ती नष्ट होणार आहेत तसेच 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती' असे आपल्या संतांनीच सांगितले आहे त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन ही वृक्षतोड थांबवावी असे आवाहन वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले. यावेळी राहुल तावरे, महेश बकशेट्टी, बाबासाहेब बारकुल, अभिजीत बोबडे, सचिन शिंदे, संतोष गायकवाड, आनंद धुमाळ, मोहम्मद शेख, वीरेंद्र भंडे, सचिन चव्हाण, अक्षय घोडके, योगेश गाडे, दादा गवळी आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments