सामान्य ज्ञान स्पर्धेत श्रावणी कांबळे प्रथम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संजीवनी पब्लिकेशन सोलापूर आयोजित तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेत सेवासदन प्रशालेच्या श्रावणी दिपक कांबळे (इ. सहावी) या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविले. संजिवनी पब्लिकेशनच्या पदाधिकारी यांच्या हस्ते श्रावणीला तीन हजार रुपयांचे धनादेश, प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यशाबद्दल मुख्याध्यापिका रनपीसे, स्मिता कोर्टीकर, संतोशी सुरवसे, सिध्दाराम तट्टे आदींनी अभिनंदन केले.

0 Comments