Hot Posts

6/recent/ticker-posts

मी पंढरपूरला जाणार अशा वावड्या विरोधक उठवितात- आ. अभिजीत पाटील

 मी पंढरपूरला जाणार अशा वावड्या विरोधक उठवितात- आ. अभिजीत पाटील





माढा (कटूसत्य वृत्त):-

माढा येथे विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित कृषी व सांस्कृतिक महोत्सव २०२५ या कार्यक्रमात आनंद शिंदे, फोक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सत्काराच्या वेळी आमदार पाटील बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, कृषी व सांस्कृतिक महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यापुढे प्रत्येक वर्षी माढा या ठिकाणीच हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी हा महोत्सव साजरा करण्यात आला. त्याआधीच्या वर्षी तो पंढरपूर येथे साजरा करण्यात आला होता. यावेळी बोलत असताना गायक आनंद शिंदे यांनी दरवर्षी हा महोत्सव भरवावा आणि तो माढा येथेच असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

यानंतर आमदार पाटील म्हणाले, काहींनी आपल्याबाबत मी पंढरपूरला जाणार अशा वावड्या उठवायला सुरुवात केली आहे. पण माढा हीच माझी कर्मभूमी आहे आणि ती आयुष्यभर राहील. जे मला भीत आहेत, तेच मी पंढरपूरला जाण्याचा अपप्रचार करीत आहेत. पण त्यांना पुन्हा एकदा पाडल्याशिवाय मी राहणार नाही, असा निर्धार त्यांनी या वेळी व्यक्त केला.

फोक प्रबोधन कार्यक्रमात जुनी भारूड, ओव्या, हालगी, अशा पारंपरिक वाद्य व गाण्यांवर माढेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद घेतला.
यावेळी माजी झेडपी सदस्य भारत शिंदे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष भाऊ महाडिक, माजी झेडपी सदस्य आनंदराव कानडे, ज्योती कुलकर्णी, विनंती कुलकर्णी भाऊसाहेब महाडिक, रावसाहेब देशमुख, बालाजी पाटील, नीलेश पाटील, आबा साठे, माजी सभापती विद्याताई शिंदे, माजी नगरसेवक शहाजी साठे, माजी पं. स. सदस्य दीपक देशमुख, बापूसाहेब जाधव, कुरण गिड्डे, संदीप खारे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments