अशोक कामटे संघटनेच्यावतीने बुधवारी शहिदांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान शिबिर
सांगोला(कटूसत्य वृत्त):-
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने बुधवार दि 26 नोव्हेंबर 2025 रोजी शहिदांच्या स्मरणार्थ सांगोल्यात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक निलकंठ शिंदे सर यांनी दिली.
स्टेशन रोड येथे विटा बँकेसमोर बुधवारी सकाळी या शिबिराचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे , सकाळी 9 ते 6 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, वीर माता , वीर पिता व माजी सैनिक यांचा व सांगोल्यातील भूमिपुत्र व प्रशासकीय सेवा बजावणारे अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भव्य किल्ले स्पर्धा 2025 बक्षीस वितरण, 26/11 तील शहिदांना आदरांजली वाहने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भारतीय संविधान दिन ,संघटनेचा 16 वा वर्धापन दिन व मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सदर शिबिराचे आयोजन गेल्या 16 वर्षापासून करण्यात येत आहे. यावर्षी रक्तदान शिबिराचे सलग 17 वे वर्ष असून रक्तदानाने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी असा संदेश कामटे संघटनेने दिलेला आहे, म्हणून अशा सामाजिक कार्यास आपण शहिदांना श्रद्धांजली रक्तदानाने अर्पण करावी असे आव्हान शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केले आहे.

0 Comments