जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते आ. दिलीप लांडे यांचा सत्कार
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- मुंबई घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्राचे आमदार दिलीप मामा लांडे यांचा सत्कार श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते घाटकोपर पश्चिम, असल्फा नगर येथील संत श्री शितोळे बाबा संस्थेच्या वतीने स्वप्नपूर्ती सोहळ्याप्रसंगी सदरचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार दिलीप मामा लांडे यांनी श्री क्षेत्र अक्कलकोटातील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धार्मिक क्षेत्रातील एक सर्वोच्च ठिकाण असून, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे गेलो असता आवर्जून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेत असल्याचे सांगितले.
यावेळी मुंबई चुनाभट्टीचे माजी नगरसेवक विजय तांडेल, राहुल वाळूंज, किरण लांडगे, शरद बारुळे, मंगेश भालेकर, सचिन मारले, संत श्री शितोळे बाबा दरबारचे पदाधिकारी, आराध्य विजय तांडेल, आरतीताई लिंगायत, अक्कलकोट चे सामाजिक कार्यकर्ते शिवराज स्वामी, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सिद्धे, अन्नछत्र मंडळाचे खजिनदार संजय उर्फ लाला राठोड, महाराष्ट्र पालखी परिक्रमा मुख्य संयोजक व विश्वस्त संतोष भोसले, मुस्लिम समाजाचे मैनुद्दीन कोरबु, सरफराज शेख, संतोष माने, रमेश हळसंगी, असद फुलारी, बाबुभाई मनुरे, उद्योगपती विक्रांत पिसे, योगीराज सिद्धे, प्रशांत शिंदे साठे, कुणाल भालेकर यांच्यासह घाटकोपर पूर्व-पश्चिम भागातील लोकप्रिय प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

0 Comments