Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते पोलीसांचा रोडरोमिओंना चोप, वाहनांवर कारवाई

 नातेपुते पोलीसांचा रोडरोमिओंना चोप, वाहनांवर कारवाई

 



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शाळा, महाविद्यालयांसह बसस्टॉपवर तरुणींची छेड काढणाऱ्या, व ट्रिपल सीट फिरणाऱ्या रोडरोमिओंची नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, पो.ह. देवीदास धोत्रे, पो.अमंलदार सारिका देशमुख, पो.कॉ. सोनवणे, पो.कॉ. गोधार, पो.कॉ. शेंडे या पोलिस कर्मचारी यांनी रोडरोमिओंना
 धरपकड करून  चांगलाच चोप दिला. शुक्रवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी शाळा भरतेवेळी व सुटण्याच्या वेळी दाते प्रशाला पुणे पंढरपूर रोड, श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला दहिगाव रोड, अक्षय शिक्षण संस्था फडतरी रोड, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय या ठिकाणी कॉलेजशी संबधित नसलेल्या काही रोडरोमीओंना नातेपुते पोलिसांनी चोप देऊन समज दिली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे इतर तरुणांनी धूम ठोकली. तसेच मेनपेट, अण्णाभाऊ साठे चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व गर्दीच्या ठिकाणी मोटर वाहनावर ट्रिपल सीट फिरणे, विना नंबर प्लेट व विना लायसन्स वाहन चालवणे या वेगवेगळ्या मोटर ऍक्ट नुसार वाहन विभागाचे वाहतुक पोलीस कर्मचारी रमेश बोराटे, नितिन पनासे यांच्याकडून वाहनांवर कारवाई करण्यात आली असून अल्पवयीन मुलांच्या वडिलांना नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी पोलीस ठाण्यामध्ये बोलवून समज दिली व यातील काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.दरम्यान, पोलिसांनी अशा प्रकारची मोहिम सातत्याने राबवावी अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. मोहीम अचानक आणि सातत्याने राबविली गेली तरच रोडरोमीओंना चाप लावता येईल असे नागरिकांचे म्हणणे आहे.


चौकटीत :
शाळेशी संबंध नसलेले तरुण शाळेच्या आवारात आढळल्यास त्यांची गय केली जाणार नाही. तसेच बस स्थानकात व इतर ठिकाणी मोटर सायकल घेऊन फिरणे, हॉर्न वाजवणे असे प्रकार निदर्शनास आल्यास त्या तरुणावर कठोर कारवाई केली जाणार असून त्यांचे वाहन जप्त करण्यात येईल. तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देऊ नये तसे निदर्शनास आल्यास अल्पवयीन मुलाच्या पालकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. नातेपुते व परिसरातील नागरिकांनी वाहन नियमाचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

         महारुद्र परजणे 
( सपोनी नातेपुते पोलीस ठाणे )

Reactions

Post a Comment

0 Comments