ती'च्या प्रकाशाच्या शोधात या नाटकाची विभागीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या 'ती'च्या प्रकाशाच्या शोधात या नाटकाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
उद्या पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव अंतर्गत विभागीय स्पर्धेसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी 'ती'च्या प्रकाशाच्या शोधात या वैज्ञानिक विषयावर आधारित नाटकात हेमा जुंजा ,प्रचिता श्रावण, लहरिका वड्डेपल्ली, लावण्या मिसालोलू, श्रीलता चिप्पा, शुभम सरवदे, आदर्श निली, समर्थ आलदी, गणेश चपळगाव आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कल्पना चावला, टे. सी.थॉमस, मारी क्युरी, रोझालीन फ्रँकलिन या महिला शास्त्रज्ञांना शोध लावताना व प्रयोग करताना महिला म्हणून आलेल्या अडचणी व त्यावर केलेले मात व विजय हे त्यांनी या नाटकातून मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत .या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक शितलकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप , नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार, मुख्याध्यापक रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन केले.
0 Comments