संत निरंकारी मंडळाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमध्ये पूरग्रस्तांना मदत
वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- करमाळा तालुक्यातील सिना नदीला महापूर आल्याने नदीकाठची काही गावे जलमय झाली होती. त्यामुळे अनेक कुटुंबांचे खूप नुकसान झाले आहे. उभी पिके,जनावरे वाहून गेली आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.गोरगरीबांची दयनीय अवस्था झाली आहे अशा परिस्थितीत "मानवाला मानव प्रिय असावा,एकमेकांचा आधार बनावा"
या संत वचनाप्रमाणे संत निरंकारी मंडळाच्या वतीने नैसर्गिक आपत्ती मध्ये अनेक पूरग्रस्तांना जीवनावश्यक अन्नधान्यवस्तूंचे कीट वाटप सोलापूर झोनमधील करमाळा,बार्शी, मोहोळ, परंडा, माढा येथे करण्यात आले. करमाळा तालुक्यातील खडकी, बिटरगाव श्री, निलज येथील पूरग्रस्तांना ही नैसर्गिक आपत्ती मध्ये जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. तसेच संत निरंकारी मिशनचाही प्रत्येक पूरग्रस्तांना मानवी आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देणारे पुस्तक देण्यात आले. तसेच खडकी, बिटरगाव, आळजापूर, निलज, खांबेवाडी 'बोरगाव, करंजे, भालेवाडी ही गावे जलमय झाली होती त्यावेळी त्या गावातील साधारणतः ४००ते ५०० लोक पोथरे तसेच धायखिंडी येथील मंगल कार्यालयात प्रशासनाने आणून ठेवली होती. त्याही वेळेस संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्वांना भोजनाची व्यवस्था केली.
यावेळी सोलापूर झोनचे झोनल प्रमुख प.पू श्री इंद्रपाल सिंहजी नागपाल महाराज यांच्या माध्यमातून करमाळा ब्रँचचे ब्रँचमुखी पोपट थोरात गुरुजी, सेवादल अधिकारी रमेश वारे जी, भैरू वळेकर जी समवेत सर्व सेवादल, मुकुंद साळूंके, मनधीर शिंदे, डॉ भाऊसो सरडे, आत्माराम वायकुळे तसेच गावचे सरपंच उपसरपंच, आदिनाथ कारखान्याचे संचालक मंडळ, तहसील प्रशासन तथा प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. या प्रेमपूर्वक निष्काम मानवतावादी कार्याबद्दल सर्व पूरग्रस्तांनी संत निरंकारी मिशनचे आभार मानले.
0 Comments