श्री. विठ्ठल व रूक्मिणी मातेस पारंपारिक पोशाखासह सह अलंकार परिधान
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- श्री. विठ्ठल व रूक्मिणी मातेस कोजागिरी पोर्णिमा निमित्त पारंपारिक पोशाखासह सह अलंकार परिधान आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोने मुकुट, मोत्याचा तुरा, नाम, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याची कंठी २ पदरी, मोत्याची कंठी १ पदरी पाचूचा लोलक, शेरपेच १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तोडे जोडे, लॉकेट १ लक्ष्मी पेंडलसह, मोहरांची माळ, तुळशीची माळ १ पदरी, सूर्यकळ्यांच्या हार, मोहनमाळ ५ पदरी, तांदळ्या हार ७ पदरी इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
तसेच *रुक्मिणी मातेस सोने मुकुट, मान्य मोत्याच्या पाटल्या जोड, मोठी नथ, कर्णफुले जोड, सोन्या मोत्याचा तानवड जोड, मोत्याचे मंगळसूत्र, खड्याची वेणी, तन्मणी मोठा, जडावाचे बाजूबंद जोड, मोत्याचा कंठ, चिंचपेटी हिरवी, बाजीराव गरसोळी, पेट्याची बिंदी, जडावाचा हार, मस्त्य जोड, वाक्या जोड, रूळ जोड, कंबरपट्टा, हायकोल, तारामंडळ इत्यादि पारंपारिक अलंकार परिधान करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
0 Comments