Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडी येथील पतसंस्थेला 7 लाख 56 हजार नफा; सभासदांना 9 टक्के लाभांश जाहीर

 विठ्ठलवाडी येथील पतसंस्थेला 7 लाख 56 हजार नफा; सभासदांना 9 टक्के लाभांश जाहीर




माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या युगात आर्थिक संस्था सक्षम व पारदर्शकपणे चालविणे ही मोठी तारेवरची कसरत आहे. कर्जवाटप करून वसुली वेळेत झाल्याशिवाय संस्थेची आर्थिक प्रगती होऊ शकत नाही.ही बाब लक्षात घेऊनच संचालक मंडळ व कर्मचारी सदोदित कार्यरत आहेत त्यामुळे संस्थेला 7 लाख 56 हजार रुपये नफा झाला आहे.सभासदांना 9 टक्के लाभांश देण्यात येणार आहे. सध्या संस्थेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने येत्या वर्षभरात पतसंस्थेची स्वतःच्या मालकीच्या जागेत नवीन सुसज्ज व अद्ययावत अशी इमारत उभारणार असल्याचे पतसंस्थेचे चेअरमन अनिलकुमार अनुभुले यांनी सांगितले.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या 28 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

पतसंस्थेचे सचिव सुशेन भांगे यांनी स्वागत करुन अहवाल वाचन केले.

पुढे चेअरमन अनभुले यांनी सांगितले की,संस्थेची एकूण उलाढाल 12 कोटी 47 लाख आहे.एकूण ठेवी 8 कोटी 92 लाख असून कर्ज वाटप 8 कोटी 64 लाख रुपये आहे.बँकेतील गुंतवणूक 2 कोटी 87 लाख रुपये आहे.भाग भांडवल 52‌ लाख रुपये आहे.सध्या पतसंस्थेचे 685 सभासद आहेत.कर्जदारांनी कर्जाचे हफ्ते वेळेवर भरावेत अन्यथा नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी सांगितले की, पतसंस्थेचे कामकाज पारदर्शक व काटकसरीने सुरू आहे त्यामुळे गावातील सुज्ञ व सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादित केला आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी गरजूंना आर्थिक मदत व सहकार्य केले जाते.विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.
सूत्रसंचालन गोरखनाथ शेगर यांनी केले.आभार सचिव सुशेन भांगे यांनी मानले.

यावेळी सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, संचालक नारायण खांडेकर, प्रगतशील शेतकरी अशोक गव्हाणे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,दत्तात्रय खैरे,गोरखनाथ शेगर,सतीश शेंडगे,अविनाश माने,नेताजी उबाळे,दिपक गव्हाणे,कैलास सस्ते,भिवाजी जाधव,दयानंद शेंडगे,शिवाजी जाधव,सुशेन मुळे,पांडुरंग खांडेकर,शिवाजी कोकाटे, पांडुरंग शिंगाडे,अरुण खांडेकर, प्रकाश खैरे,जानूबुवा खांडेकर, सदाशिव दळवी,धनाजी सस्ते, कैलास खैरे,गहिनीनाथ जगताप,दत्तात्रय काशीद,संदीप मुळे,विश्वनाथ बाबर,भिमराव नागटिळक,दिनकर कदम, मधूकर कदम,युवराज शेगर, नेताजी खैरे यांच्यासह ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments