Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जयहिंद विद्यालय तृतीय

 जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत जयहिंद विद्यालय तृतीय




 कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालयाने कब्बडी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे.दि. 5 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी विद्यालय, चिखली येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये कसबे तडवळे येथील जयहिंद विद्यालयाने धाराशिव जिल्ह्यात वर्चस्व कायम राखत 17 वर्षे वयोगटाखालील मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. या वयोगटात धाराशिव जिल्ह्यातील एकूण 8 संघ सहभागी झाले होते.या संघांचा जिल्हा क्रीडा अधिकारी व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये रोहन रणजित गाढवे, सार्थक हनुमंत पवार,मयूर किरण तोडकर, आदित्य बाबासाहेब चव्हाण,संदिप सचिन कांबळे,मयूर सतीश सपाटे,ऋषिराज हनुमंत कांबळे, प्रज्ज्वल विठ्ठल भवर,समर्थ सचिन बोंगाळे या खेळाडूंचा समावेश होता.या सर्व खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळालेल्या प्रमाणपत्राचा फायदा एस.एस.सी. परीक्षेतील वाढीव गुणांसाठी होणार आहे.सर्व यशस्वी खेळाडूंना ठाकरे पी.के.व पठाण आय.एल.यांचे मार्गदर्शन लाभले.सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे,सचिव पी.टी.पाटील, सहसचिव अरुण देबडवार,शा.व्य. समितीचे चेअरमन टी.पी.शिनगारे, उपाध्यक्ष हनुमंत पवार,मुख्याध्यापक एस.एस.पाटील,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ,पालक,यांनी कौतुक केले.

Reactions

Post a Comment

0 Comments