सरन्यायाधीशांवर हल्ला करणे म्हणजे न्यायसंस्थेवरच हल्ला
सोलापूर बार असोसिएशन कडून निषेध व्यक्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने केलेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी सोलापूर बार असोसिएशन तर्फे आज तातडीची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. ही सभा सकाळी 11.00 वाजता बार असोसिएशन हॉलमध्ये झाली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव होते. सभेचे प्रस्ताविक उद्गार सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी काढले. त्यांनी या घटनेमुळे संपूर्ण वकिलकी व्यवसायावर डाग लागल्याचे नमूद करत, या घटनेचा सर्वतोपरी निषेध करण्याचे आवाहन केले.
या सभेतमान्यवर ॲड. रविराज सरवदे, ॲड. संजय गायकवाड, ॲड. मळसिद्ध देशमुख,ॲड. व्ही.पी. शिंदे, ॲड. आकाश माने, ॲड. अजय रणशुंगारे, ॲड. बापूसाहेब देशमुख, ॲड. संजीव सदाफुळे, ॲड. बापूसाहेब गायकवाड, ॲड. शरद पाटील, ॲड. भारत कट्टे यांनी आपली मते मांडली.
सभेस बारचे उपाध्यक्ष ॲड. रियाज शेख यांनी या घटनेचा निषेध करत न्यायसंस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.
तसेच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे विद्यमान सदस्य ॲड. मिलींद थोबडे यांनी या घटनेचे गांभीर्य अधोरेखित करत, अशा प्रकारच्या घटना वकील समाजाच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या असून, संपूर्ण वकिल समाजाने एकजुटीने अशा कृतींचा विरोध करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “वकील हा न्यायप्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे. सरन्यायाधीशांवर हल्ला करणे म्हणजे न्यायसंस्थेवरच हल्ला आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.”
सभेत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला की,सोलापूर बार असोसिएशन तर्फे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदविण्यात येतो. व त्याचे अधिकृत निवेदन बार कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा तसेच बार कॉन्सिल ऑफ इंडिया यांना पाठविण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला.
सभेचे सूत्रसंचालन बारचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर आभारप्रदर्शन खजिनदार ॲड. अरविंद देडे यांनी मानले.
सभेच्या शेवटी सर्व वकिलांनी सरन्यायाधीशांबद्दल आदर व्यक्त करत, न्यायसंस्थेच्या सन्मानाचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
0 Comments