नेताजी शिक्षण संकुलात दीपोत्सव कार्यक्रम उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात असलेल्या हनुमान मंदिराच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे यंदाही दीपावली पाडवा निमित्त दीपोत्सवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या मंगलमय सोहळ्यात ४७४ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पारंपरिक व भक्तिमय वातावरणात साजरा झालेल्या या सोहळ्यात मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला.
प्रथम संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार व खजिनदार ललिता कुंभार यांच्या हस्ते श्री हनुमान देवाची पूजा करण्यात आली तदनंतर माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, प्राचार्य रविशंकर कुंभार, शेळगी प्रशालेचे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, संस्था हितचिंतक महादेव वांगीकर, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, वैशाली कुंभार, सेवानिवृत्त शिक्षक धर्मराज बळ्ळारी, लक्ष्मीकांत त्रिशुले आदी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. वेदमूर्ती विश्वाराध्य मठपती यांनी मंत्रोच्चार करत विधिवत पूजन केले. मंदिर परिसर हजारो दीव्यांनी उजळून निघाला. यावेळी १९९४ ते २०२० या शैक्षणिक कालावधीतील सुमारे ४७४ माजी विद्यार्थ्यांनी या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात सहभाग घेतले.
यावेळी अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, नेताजी शिक्षण संस्थेच्या भरभराटीत सर्व माजी विद्यार्थ्यांचे योगदान आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व संस्कारित होण्यासाठी शिक्षकांचे खूप मोठे योगदान आहे.आज या शाळेतील माजी विद्यार्थी हे प्रशासकीय, सामाजिक,राजकीय, औद्योगिक व संशोधन आदी विविध क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करत आहेत. हे संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. यावेळी सचिन अंबलगी, अश्विनी विडप, मनोज अदटराव, लक्ष्मी चिलवेरी, आरती बत्तुल आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत केले.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक राजकुमार मरगुरे, विठ्ठल कुंभार, संगप्पा दसगोंडे, काशिनाथ माळगोंडे, राजेंद्र मुलगे,गणपती पाटील , षडाक्षरी हिरेमठ, शिवकुमार शिरुर,अशोक पाटील, सूर्यकांत बिराजदार, चंद्रशेखर पाटील, रेवणसिद्ध दसले,प्रकाश कोरे, विनायक कोरे, विजयालक्ष्मी माळदवकर, जयश्री बिराजदार, मीनाक्षी वांगीकर,सविता रामशेट्टी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

0 Comments