स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीच अव्वलस्थानी राहील
- उपमुख्यमंत्री अजित पवार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पंचायत समिती जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा तळागाळात पोहोचवा, महायुती सरकारच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आले आहेत या योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवून द्या अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथील विधान भवन कौन्सिल हॉल येथे त्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, माणिक कांबळे, आकाश जाधव महादेव राठोड, आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होते होती. सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कशी वाढेल यासाठी प्राधान्य द्या तळागाळातील कार्यकर्त्यांचे अडीअडचणी सोडवा गट तटाच्या भानगडीत पडू नका सोलापूर महानगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वाधिक नगरसेवक कसे निवडून येतील याकडे विशेष भर द्यावे अशा सूचना देखील यावेळी पवारांनी किसन जाधव यांना दिल्या. यावेळी किसन जाधव यांनी सोलापूर शहरातील विविध विकास कामांच्या संदर्भात अजित पवार यांच्या समवेत चर्चा केली. सोलापूर शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली.
0 Comments