कर्मवीर कृषी महाविद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ कार्यक्रम उत्साहात
बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालया मधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ हा शैक्षणिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे खजिनदार जयकुमार शितोळे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उद्योजक संजय पाटील, मंडल कृषी अधिकारी सयाजीराव गायकवाड होते. पाहण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कृषी उद्योजक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचा उपयोग केवळ पदवीपुरता न करता, उद्योजकता विकासासाठी करावा याविषयी मार्गदर्शन केले तर सयाजी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांसोबत सामाजिक बांधिलकी जपावी यासाठी आव्हान केले. या कार्यक्रमास कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य गलांडे पि. आर. कार्यालयीन अधीक्षक मोरे टी. एस. व इतर प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.बी शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी आकांक्षा मिरगणे आणि विमल बगाडे या विद्यार्थिनी केले. तर आभार प्रदर्शन विस्तार शिक्षण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शेंडे एस. एस. यांनी केले.
0 Comments