प्रभाग क्रमांक ४ चा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी दत्तात्रय खवळे यांच्या उमेदवारीची गरज
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या दहा वर्षापासून केवळ विकास आणि विकासाची चर्चा सातत्याने होत असलेल्या आणि राष्ट्रवादीचा भक्कम बालेकिल्ला बनलेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये निवडणूकपूर्व वातावरण आता चांगलेच तापले आहे. प्रभाग क्रमांक चार हा नव्याने गतनिवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक सात यांचा मिळून संयुक्तरित्या पुनर्गठीत करण्यात आला आहे.
सध्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक पदाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादीचे युवा नगरसेवक आणि राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक दत्ताअण्णा खवळे हे करत आहेत. माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून प्रभागात जास्तीत जास्त निधी खेचून आणत रस्ते, पाणी, आरोग्य, वीज त्याचबरोबर स्वच्छतेच्या विविध सुविधांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे काम दत्ता खवळे यांनी केले आहे.
या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या दहा वर्षांपासून दत्तात्रय खवळे हे सातत्याने प्रयत्नशील राहीले आहेत. हे प्रभागातील सुजाण जनतेने वेळोवेळी पाहिले आहे. त्यामुळे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी बाबत दत्तात्रय खवळे यांचे पारडे सध्या जड असल्याचे यापूर्वीपासूनच जाणवत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या प्रभागातून दत्तात्रय खवळे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
दत्ताअण्णा खवळे यांनी सुरू केलेला विकासाचा झंझावात आता यापुढेही खवळे यांच्याच परिवाराच्या माध्यमातून अविरतपणे सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे गत महिनाभरापासूनच खवळे यांचे समर्थक प्रभागातील सर्वसामान्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत आहेत.
गत दहा दिवसापूर्वीच मुस्ताकभाई शेख आणि दत्ताअण्णा खवळे यांनी दोन बोअर घेऊन त्यावर विद्युत पंप बसवून प्रभागातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही प्रभागात अनेक ठिकाणी नवी जलवाहिनी टाकून खवळे यांनी या प्रभागातील सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पाणी देऊन पाणीदार नगरसेवक अशी सकारात्मक ख्याती मिळवली आहे.
चौकट
गतवेळी किंगमेकर ठरलेले मुस्ताक शेख यांच्या भूमिकेकडे लक्ष...
आता त्यांच्या जोडीला या प्रभागातून राष्ट्रवादीचे यापूर्वीचे स्वीकृत नगरसेवक आणि राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक मुस्ताकभाई शेख यांच्या उमेदवारीची चर्चा सुरुवाती पासूनच होती. मात्र हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे. त्यामुळे महिला उमेदवारास संधी द्यावयाची असल्यामुळे ते कुटुंबातील सदस्याला उमेदवारी घेणार की आणखी कोणा मागे राजकीय ताकद लावणार याबाबत मोठी उत्सुकता पणाला लागली आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत अभ्यासू नेतृत्व असलेले मुस्ताकभाई शेख यांनी किंगमेकर होण्याची भूमिका सार्थ निभावली होती. आता या ही निवडणुकीत तेच किंगमेकर होण्याची खात्री पक्षश्रेष्ठींना आहे त्यामुळे मुस्ताक शेख यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments