ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमा निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कपाळावर कुंकवाचा भंडारा, मुखी आधी मायेचा गजर करीत अनवाणी पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाच वाटप करण्यात आले यंदाचे हे २५ वे वर्ष असून मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तुळजापूर मार्गावरील मशरूम गणपती परिसरात हजारो भाविकांना महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसाद सोहळ्याचे शुभारंभ प्रसंगी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल दादा जाधव, शिवाजी गायकवाड,चंदू ब्रदर जाधव, अंबादास जाधव शहा नगर, स्वामी काका, श्रीमंत सुरवसे मामा, अंबादास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, सिकंदर शेख,राजू ब्रदर जाधव, विनोद भाऊजी गायकवाड नितीन भाऊजी एडवोकेट किरण गायकवाड,राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, प्रेम नागेश गायकवाड, तेजस गायकवाड,अजिंक्य जाधव,करण जाधव,नागेश ढेंगळे, सागर कांबळे,अमोल लकडे, शिवानंद बंडगर,मोहन अध्यक्ष गायकवाड,बाबा सावंत,अंबादास कोळी,पंडित शेटे, श्री गिरी,तेजस गायकवाड,अल्ताफ नदाफ,दर्शन दुबे, सुनील कांबळे,फिरोज पठाण, निखिल गंभीरे,केतन निकम,वीरेश सुतार,अर्जुन साळवे,महेश म्हेत्रे, प्रथमेश पवार, किरण शिंदे,अमोल जगताप,जयेश जाधव,सचिन (अक्षय) जाधव,उमेश जाधव,संतोष गायकवाड हुडको, शरद शिंदे, सचिन गुत्तेदार, हरीश तेलगू, संतोष ऋतिक गायकवाड,निलेश कांबळे, माऊली जरग,श्रीशैल चौगुले,पवन बेरे,ऋषी येवले,सागर शिवपूरकर संजय भडंगे, सोनू तळभंडारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून महाप्रसादाचे नैवेद्य चढवून या प्रसाद वाटप कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले.कोजागिरी पौर्णिमा निमित्त लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापूरला भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी अनवाणी पायी चालत जात असतात कर्नाटक, आंध्र, तेलंगणा अशा अन्य विविध राज्यातून लाखो भाविकांचा त्यामध्ये समावेश असतो. गेल्या पंचवीस वर्षापासून आजतागायत ईच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या महाप्रसाद वाटपचे अखंड सेवा आज तागायत मंडळाचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे तसेच सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी आई जगदंबा त्यांना बळ द्यावे असे साकडे देखील यावेळी मंडळाचे मार्गदर्शक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी आई तुळजाभवानी चरणी घातलं.आद्यी मायेचा गजर करीत लाखो भाविका तुळजापूरकडे मोठ्या भावाने अमाप उत्साही वातावरणात रवाना झाले.
0 Comments