Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग नऊ मधून निवडणूक लढविण्यासाठी लखनभाऊ कोळी सज्ज

 प्रभाग नऊ मधून निवडणूक लढविण्यासाठी लखनभाऊ कोळी सज्ज




पाच वर्षापासून सोडवल्या प्रभागातील समस्या प्रशासनाकडे केलेला अविरत पाठपुरावा उपयोगी ठरणार

मोहोळ (साहिल शेख):- मोहोळ शहराच्या दक्षिण हद्दवाढ भागातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असलेल्या प्रभाग नऊ मधून अनेक दिग्गज निवडणूक लढवण्याच्या पूर्वतयारीला लागले आहेत. मात्र ही निवडणूक लागण्यापूर्वी तब्बल पाच वर्षे पूर्वीपासून या प्रभागातील रस्ते, पाणी, आरोग्य व अन्य समस्यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करत त्या समस्या नगरपरिषद स्तरावर वेळोवेळी मांडत त्यांचा पाठपुरावा करणारे प्रभागातील युवा नेते लखनभाऊ कोळी यांनी देखील निवडणुकीच्या जणू प्रचाराचा प्रारंभ केला आहे. आरक्षण प्रक्रियेमध्ये प्रभाग नऊ हा सर्वसाधारण महिला आणि ओबीसी खुला असल्यामुळे लखन कोळी हे ओबीसी खुल्या प्रवर्गातून ही निवडणूक लढवणार आहेत.


प्रभागातील विविध राजकीय आणि सामाजिक गणितांचा अभ्यास करत लखन कोळी यांनी अनेक मान्यवरांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहे.  प्रभागातील विविध मूलभूत सुविधांबाबत प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेण्यास प्रारंभ केला आहे. या प्रभागात वास्तव्यास असलेले आणि प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी चोवीस तास दक्ष असलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणून कोळी यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे. शेकडो मित्र परिवाराचे संघटन आणि संघटन कौशल्याच्या माध्यमातून प्रभागाच्या समाजहितोपयोगी उपक्रमासाठी कोळी यांचे सातत्याने योगदान असते. त्यामुळे अल्पावधीतच लखन कोळी यांच्याबाबत प्रभागात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यापूर्वीपासूनच लखन कोळी हे या प्रभागातील विविध समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी धडपड करणारा जीवाभावाचा माणूस म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे. त्यामुळे या प्रभागातुन निवडणूक लढवण्यामागची भूमिका मतदारांसमोर विशद करणे त्यांना आता तितकेसे जड जाणार नाही. त्यामुळे लखन कोळी यांची उमेदवारी निश्चितपणे या प्रभागातील निवडणुकीची राजकीय दिशा बदलवू शकते.


चौकट

सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले लखनभाऊ कोळी...

लखन कोळी आणि त्यांच्या परिवारातील सदस्य सातत्याने मोहोळ शहरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून समाजपयोगी उपक्रम राबवत असतात. त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, त्याचबरोबर महर्षी वाल्मिकी कोळी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य निदान शिबिर, नेत्र उपचार शिबिर, चष्मे वाटप तसेच मोतीबिंदू तपासणी शिबिर या विविध उपक्रमांचा समावेश आहे. दरवर्षी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चास फाटा देऊन मूकबधिर शाळेमध्ये शालेय साहित्य आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्याबरोबर अनेक गोरगरीब गरजू नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना वर्षभर विविध स्वरूपात मदतीचा हात देण्यामध्ये देखील त्यांचा हातखंडा आहे. अशा या सर्व समावेशक युवा नेतृत्वाच्या उमेदवारीमुळे प्रभागाचा विकासात्मक चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही अशी अपेक्षा प्रभाग नऊ मधील सर्वसामान्य जनतेला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments