लहान मुलांसाठी खेळणी व खुली व्यायाम शाळाचे काम पुर्ण
प्रभागाला विकासाचे रोल मॉडेल बनवणाऱ्या दत्तात्रय खवळे हेच पुन्हा लढणार
मोहोळ (साहील शेख):- मोहोळ शहराच्या पूर्व भागातील महत्त्वाचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि नवीन प्रभाग रचनेनुसार झालेल्या प्रभाग क्रमांक चार हा आता विकसित प्रभाग म्हणून शहरात ओळखला जात आहे. सहकार परिषदेचे अध्यक्ष राज्यमंत्री ना.राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार यशवंत माने यांच्या निधीतून या प्रभागामध्ये लहान मुलांसाठी खेळणी व खुली व्यायाम शाळाचे काम पूर्ण करण्यात आले. याशिवाय अद्यावत रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच आरोग्यविषयक सोयी सुविधांसाठी परिपूर्ण असलेला हा प्रभाग आता मोहोळ शहरातील सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून ओळख निर्माण करत आहे.या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे संपूर्णता श्रेय राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मुस्ताक शेख माजी नगरसेवक दत्तात्रय खवळे यांना जाते. नव्याने झालेल्या आरक्षणा नुसार या प्रभागातून पुन्हा दत्तात्रय खवळे हेच निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचबरोबर या प्रभागातून सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण झाल्यामुळे पक्षश्रेष्ठी मुस्ताक शेख यांच्या कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देणार की मुस्ताक शेख हे कार्यकर्त्यांना संधी देणार याबाबतची उत्सुकता या पूर्वीपासूनच ताणली गेली आहे.प्रभागाचा विकास करणाऱ्या या नगरसेवक जोडीच्या कामाचा झंझावात संपूर्ण मोहोळ शहरात चर्चेला जात आहे हे मात्र नक्की.
चौकट
मोहोळ शहराच्या पूर्व भागातील महत्त्वाचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवीन प्रभाग रचनेनुसार झालेल्या प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून नगर विकास विभागाकडे आणि माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून ज्येष्ठ नेते शहाजान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील जवळपास सर्वच रस्ते अद्यावत काँक्रिटीकरणाने जोडले आहेत.
मुस्ताक शेख
माजी नगरसेवक
चौकट
गत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहा मधील सुजाण नागरिकांनी मला नगरसेवक होण्याची अत्यंत महत्त्वाची अशी सुवर्णसंधी दिली. त्या संधीचे सोने करण्यासाठी सर्वप्रथम प्रभागातील सर्व अडचणींचा अभ्यास केला. मोहोळ नगरपरिषदेचे विकास मार्गदर्शक तथा माजी आमदार राजन पाटील, मोहोळचे विद्यमान आमदार तथा आम्हा नगरसेवकांचे मार्गदर्शक माजी आ.यशवंत तात्या माने, शहराचे विकास मार्गदर्शन शहाजान शेख, युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांनी सुरुवातीपासून विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळेच आज प्रभागाचा विकासात्मक चेहरामोहरा बदलू शकलो.
दत्तात्रय खवळे
माजी नगरसेवक
0 Comments