प्रभाग क्रमांक १ सर्वसाधारण खुला झाल्याने दिग्गज इच्छुकांमध्ये चुरस वाढली
राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी सुदर्शनभाऊ गायकवाड पक्षश्रेष्ठींना भेटणार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना पक्षाच्या ताब्यात असणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 चे आरक्षण सोडत सर्वसाधारण पुरुष आणि इतर मागास प्रवर्ग महिल झाल्याने या प्रभागातून अनेक दिग्गज उमेदवारांची नावे समोर येताना दिसतायेत. या नगरपरिषद निवडणुकीत काहीही झालं प्रभाग एक मधूनच उमेदवारी घेऊन निवडणूक लढवायची असा निर्धार अनेकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून युवा नेते सुदर्शन भाऊ गायकवाड यांचे नावाचीही चर्चा जोरात सुरू आहे. कोविड कालावधी पूर्वी निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुदर्शन भाऊ गायकवाड यांनी पक्षश्रेष्ठी तथा माजी आमदार राजन पाटील, बाळराजे पाटील अजिंक्यराणा पाटील यांची भेट घेऊन पूर्वीच्या 11 म्हणजे नव्याने झालेल्या प्रभाग १ मधून राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारीची संधी देण्याची मागणी केली होती. या शिवाय प्रभागातील गेल्या अनेक वर्षापासून संपर्क असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील सुदर्शन भाऊ गायकवाड यांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत.
प्रभागातील विविध अडीअडचणी प्रभावीपणे शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुदर्शन भाऊ गायकवाड यांनी आजवर केला आहे. अनेक ठिकाणी बोअर मारून पाण्याची सोय केली तर आवश्यक त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर स्वखर्चातून उभे करून शेतीपंपाच्या विजेचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे सुदर्शन गायकवाड यांची उमेदवारी सध्या जमेची बाब या प्रभागातील अनेकांना वाटत आहे. त्यामुळे गायकवाड यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी प्रभागातील एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील यांना भेटणार असल्याचे समजते.
चौकट
सुदर्शन भाऊ गायकवाड हे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटन संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान देखील मोठे आहे. रक्तदान शिबिर, वृक्षारोपण शिबिर, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती दरम्यान विविध सामाजिक आणि प्रबोधनपर उपक्रम राबविण्याचे कार्य त्यांनी मोहोळ शहरासह संपूर्ण जिल्ह्यात केले आहे.
चौकट
दरवर्षी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत त्यांनी धान्य वाटप त्याचबरोबर कोरोना काळात स्वखर्चातून त्यांनी निर्जंतुकीकरण फवारण्या करून शहरवासीयांना दिलासा दिला. छावा संघटनेच्या माध्यमातून विविध प्रश्नावर आंदोलने करत प्रशासनाचे लक्ष वेधत सदरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. प्रभागामध्ये सुदर्शन गायकवाड यांची चांगली क्रेझ असुन शहरातील एक कुशल युवा संघटक म्हणून सुदर्शन भाऊ गायकवाड यांच्याकडे पाहिले जाते. प्रचंड जनसंपर्क आणि समाजकार्याची आवड या सुदर्शन गायकवाड यांच्या जमेच्या बाजू आहेत.
0 Comments